
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी अचानक कामाचा ताण वाढू शकतो. तुम्हाला काम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. ऑफिसमध्ये तुमचे चांगले काम पाहून तुमचे सहकारी तुमच्याकडून काहीतरी नवीन शिकतील. तुमच्या चांगल्या कामांमुळे समाजात तुमचा सन्मान वाढेल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

आज तुमचा दिवस चांगला जाईल. गरीब व्यक्तीला मदत केल्याने मनःशांती मिळेल.तुमच्या कुटुंबाच्या पूर्ण सहकार्याने तुम्ही कोणतीही मोठी समस्या सोडवू शकाल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

आज जर तुम्ही व्यावहारिकदृष्ट्या विचार केला तर तुमच्या संतुलित वृत्तीचा तुम्हाला फायदा होईल.तुम्ही तुमच्या मित्रांसोबत काम करण्याच्या नवीन पद्धतींवर चर्चा कराल. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

आज तुम्ही कोणाशीही अनावश्यक वाद टाळाल तर तुमच्यासाठी चांगले राहील.पैशाच्या बाबतीत लोकांवर जास्त विश्वास ठेवणे टाळावे. प्रेमीयुगुलांमध्ये सुरू असलेले मतभेद आज संपुष्टात येतील. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

आज तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीशी वाद घालणे टाळाल. एखाद्याला पैसे उधार देण्यापूर्वी विचार करणे चांगले होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त असणार आहे. तुमच्या घरी पाहुण्यांच्या आगमनामुळे वातावरण प्रसन्न राहील. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

आज तुम्हाला व्यवसायात अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. भावा-बहिणींमध्ये सुरू असलेला वाद चर्चेतून संपुष्टात येईल. तुमच्या जवळचा कोणीतरी तुमचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न करू शकतो. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. तुमची मेहनत सुरू ठेवा. तुम्हाला लवकरच यश मिळण्याची शक्यता आहे. आज कोणत्याही कायदेशीर बाबींमध्ये घाई करू नका. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

आज तुम्ही पैसा आणि संपत्तीच्या बाबतीत व्यस्त असाल.आत्मनिरीक्षण करण्याची योग्य वेळ आहे. नात्यात उत्साह येण्याची शक्यता आहे परंतु कोणत्याही प्रकारची बांधिलकी टाळा. भविष्यात तुम्हाला चांगले दिवस येतील. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)