Shukra Gochar 2025 : शुक्र गोचरमुळे जूननंतर 3 राशीच्या लोकांचे दिवस बदलणार, प्रेमाचं गणित अलगद सुटणार!

Shukra Gochar 2025 In Taurus : शु्क्र ग्रह जवळपास एक वर्षानंतर वृषभ राशीत परतत आहे. शुक्र ग्रहाच्या वृषभ गोचरमुळे 3 राशीच्या लोकांचे दिवस बदलणार आहेत. या 3 राशीच्या लोकांना काय फायदा होऊ शकतो? जाणून घ्या.

| Updated on: May 19, 2025 | 6:45 PM
1 / 5
शुक्र सध्या मीन राशीत भ्रमण करत आहे. शुक्र मे महिन्याच्या अखेरीस मेष राशीत आणि जून अखेरीस वृषभ राशीत भ्रमण करणार आहे. शुक्र एका राशीत सुमारे एक महिना भ्रमण करतो. तसेच 12 किंवा 13 महिन्यानंतर पुन्हा त्याच राशीत परततो. त्यामुळे शुक्राचं स्वतःच्या अर्थात वृषभ राशीत गोचर महत्त्वपूर्ण समजलं जात आहे. (Photo Credit : Tv9 Hindi)

2 / 5
शुक्र वृषभ राशीत 29 जूनला दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी गोचर करणार आहे. त्यामुळे 3 राशींवर चांगला परिणाम होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या 3 भाग्यवान राशी कोणत्या आहेत? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात. (Photo Credit :  Pinterest)

3 / 5
वृषभ राशीत शुक्र ग्रह गोचर करणार आहे. त्यामुळे शुक्र गोचर वृषभ राशीला फायदेशीर ठरु शकतं. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना संपत्ती मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारु शकते. कला क्षेत्रात काम करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांना त्यांचे प्रेम मिळेल.  तसेच लग्न होऊ शकतं. नोकरीत पदोन्नती आणि व्यवसायात मोठा नफा होऊ शकतो. (Photo Credit : Tv9 Hindi)

4 / 5
शुक्र गोचर कन्या राशीसाठी भरभराटीचं ठरु शकतं. कन्या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. कन्या राशीच्या लोकांना चहुबाजूने यश मिळेल. आयुष्यात सुख आणि शांतीचे मार्ग खुले होतील.अध्यात्माकडे कल वाढेल. कौटुंबिक प्रश्न सहज निकाली काढता येतील. (Photo Credit : Tv9 Hindi)

5 / 5
शुक्र गोचरमुळे मकर राशीच्या लोकांना फायदा होईल. मकर राशीच्या लोकांना केलेल्या कामाचे चांगले परिणाम मिळतील.उच्च शिक्षणाचे मार्ग खुले होतील. रखडलेली कामं पूर्ण होतील. संपत्तीत वाढ झाल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकेल. गमावलेलं प्रेम परत येऊ शकते. (Photo Credit : Tv9 Hindi)  (Disclaimer: वरील माहिती ही सामान्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्ठी करत नाही.)