AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 28 जून 2023, या राशीच्या लोकांना वेतनवाढ होण्याची शक्यता आहे

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांना नवीन संधी नवीन मार्ग सापडतील. संकुचित मनोवृति टाळावी.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 28 जून 2023, या राशीच्या लोकांना वेतनवाढ होण्याची शक्यता आहे
राशी भविष्यImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 29, 2023 | 9:22 AM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashi bhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

बारा राशींचे आजचे राशी भविष्य

मेष

नोकरी रोजगारात आपले कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल. आपल्या अंगीभूत कलागुणांना चांगले वातावरण राहिल. आध्यात्मिक व धार्मिक स्वरूपाचं लेखन होईल बेरोजगारांना रोजगार मिळेल. व्यापार व्यवसायातील वातावरण चांगले राहिल. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागतील. विवाह इच्छूकांचे विवाह जुळून येतील. संततीकडून शुभवार्ता समजतील. प्रेमप्रकरणात स्नेह वाढेल.

वृषभ

भावंडांशी संबंध दुरावणार नाहीत याची काळजी घ्या. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे अन्यथा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरीत संघर्षाचे प्रसंग घडतील. काही बाबतीत मानसिक ताणतणाव निर्माण होतील. व्यापारात महत्वाचे निर्णय शक्यतो आज टाळावेत. नातेवाईकांशी असलेल्या संबंधात मर्यादा राखा. मानसिक ताणतणावामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात विवाद टाळावेत.

मिथुन

नोकरीत विरोधक कारवाया करयाची संधी दवडणार नाहीत. व्यापारात उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण वाढेल. दैवी पाठबळ लाभणार नाही. वास्तुविषयी प्रश्न, कामे रेंगाळतील. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. बोलताना शब्द तोलुन-मापून वापरावेत अन्यथा समोरचा व्यक्ती दुखावला जाण्याची शक्यता आहे. व्यापारात नुकसान संभवते. समाधानात वृद्धी करणारा दिवस आहे. वाहन घर खरेदीचा योग आहे.

कर्क

मोठ्या व्यक्तींचा सहवास लागेल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकेल. संशोधनात्मक कार्य आपल्या हातून होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला फायदा होईल. परंतु अप्रतिष्ठा होण्याचे योग आहेत. काहीना प्रमोशन मिळण्याची किंवा वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात वृद्धि होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही या विषयी काळजी घ्यावी.

सिंह

जुन्या प्रॉपर्टीचे प्रश्न आचानक उद्भभवतील. दिनमान समिश्र फलदायी. नोकरीत गैरसमजाचे वातावरण राहिल. वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागेल. वरिष्ठांकडून कामाची अपेक्षा वाढणारआहे. व्यापारात फसगत होण्याची शक्यता आहे. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीवर फारसे विसंबून राहू नका. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही याकडे लक्ष द्यावे. अपेक्षित कामे रखडण्याची शक्यता आहे.

कन्या

नोकरीत कर्तुत्वाला चांगली संधी निर्माण होईल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता आहे. नवनवीन योजना कार्यान्वित करू शकाल. मोठ्या भांवडाकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक लाभ होतील. कौटुंबिक वातावरण चांगले व आनंददायी रहिल. लिखाणास उत्तम दिवस आहे. विद्याभ्यासात प्रगती राहिल. आज मानसन्मान पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.

तुला

दुसऱ्याला जामीन राहू नका अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे. आज काही बाबतीत यश संपादन करू शकाल. व्यापार रोजगारात आर्थिक उन्नती होईल पण खर्चाचे प्रमाणही वाढेल. आपल्या आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. नोकरीत बढतीची शक्यता राहिल. राजकारणात किंवा समाज कारणात आपली प्रतिष्ठा ढासळ्याची शक्यता आहे.

वृश्चिक

मोठ्या व मान्यवर व्यक्तींच्या गोठाभेटी होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. नवीन जागा घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. नोकरीत प्रशंसा केली जाईल. प्रलोभनाला मात्र बळी पडू नका. व्यापारात नवीन योजना आखाल. नवीन उपक्रम सुरू कराल. आत्मविश्वास व मनोबल उंचावलेले राहिल. संतती सौख्य उत्तम राहिल. शेअर्स मधील दिर्घकालीन गुंतवणुक फायदेशीर ठरेल.

धनु

काहीसा अडचणीत आणणारा त्रासदायक दिवस ठरेल. पनी-पत्नीमध्ये बेबनाव गैरसमज होणार नाही याविषयी काळजी घेणे योग्य ठरेल. नोकरीत खुप मेहनत घ्यावी लागेल. आपल्या विरुद्ध मात्र गैरसमज किंवा निंदानालस्ती होण्याची शक्यता आहे. मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता राहील. हातून वाईट अनैतिक कृत्य होण्याची संभावना आहे. जमीन जुमल्याच्या व्यवहारात नुकसान होईल.

मकर

विरोधकावर मात करू शकाल. आपले वर्चस्व सिद्ध कराल. व्यापारात विरोधक आक्रमक होतील. त्याचा बीमोड करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. मित्रमैत्रिणींकडून सहकार्य मिळेल. स्विकारलेली कामे यशस्वी होतील. मनाजोग्या घटना घडतील. आर्थिक आवक वाढेल. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळावेत. वाहन सावकाश चालवा. नव्या योजनाना आज चांगला प्रतिसाद मिळेल.

कुंभ

रोजगारात स्वतःच्या विवेक बुद्धीने निर्णय घ्या. बढतीची शक्यता आहे. नवीन संधी नवीन मार्ग सापडतील. संकुचित मनोवृति टाळावी. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पदप्राप्ती मिळेल. आपली प्रतिष्ठा वाढीस लागेल. कामात यश आल्याने आपले मनोधर्य उंचावेल. दुर्व्यसनांपासून सावध राहा. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. शासकीय कामकाजास शुभ दिनमान आहे. गूढशास्त्राकडे कल राहिल.

मीन

आज तीर्थ किंवा धार्मिक स्थळांना भेट नोकरी निमित्त दुरवरचे प्रवास घडतील. प्रवासातुन लाभ होईल. अध्यात्म क्षेत्रात रममाण होण्याची शक्यता आहे. भाग्योदय होण्याचा योग असून मान्यवर व मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. आपले डावपेच यशस्वी होतील. सत्संग संत दर्शन घडेल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. व्यापारात योजना सफल होतील. मंत्रजप ईश्वराची आराधना याकडे कल राहिल. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहिल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित