
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कॅप्टन फाफ डु प्लेसिसने शानदार खेळ दाखवला. फाफने लखनौ विरुद्ध 96 धावांची खेळी केली. त्यानेच RCB च्या विजयाची स्क्रिप्ट लिहीली.

आरसीबीची कॅप्टनशिप संभाळणार फाफ सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. आरसीबीचा कॅप्टन मैदानात धावांच्या राशी उभारत होता. त्यावेळी त्याची पत्नी इमारी विसेर प्रेक्षक स्टँडमध्ये बसू सामना एन्जॉय करत होती.

प्रेक्षक गॅलरीत बसून इमारी विसेर नवऱ्याचा फाफ डु प्लेसिस आणि आरसीबी टीमचा उत्साह वाढवत होती.

फाफ डु प्लेसिस मूळचा दक्षिण आफ्रिकेचा आहे. पण भारतात त्याची मोठी फॅन फॉलोइंग आहे. आरसीबीच्या आधी फाफ चेन्नई सुपर किंग्सकडून खेळायचा.

फाफ डु प्लेसिसने 2013 मध्ये लॉन्ग टाइम पार्टनर इमारी विसेर सोबत लग्न केलं. केप टाउन जवळ असलेल्या जाल्जे वाइन इस्टेटमध्ये विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता.

फाफ आणि इमारीला दोन मुली आहे. 2017 मध्ये इमारीने एमिली आणि त्यानंतर तीन वर्षांनी 2020 मध्ये जोई नावाच्या मुलीला जन्म दिला.

फाफची पत्नी इमारी विसेर पेशाने मार्केटिंग मॅनेजर आहे. दक्षिण आफ्रिकेतील सौंदर्य प्रसाधने बनवणारी कंपनी निम्यू स्किन टेक्नोलॉजीसाठी काम करते.

इमारीत विसेरचीही सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे दीड लाख फॉलोअर्स आहेत. तिचे फोटो, व्हिडिओ फॅन्सना प्रचंड आवडतात.

फाफ डु प्लेसिसने काल लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 96 धावांची खेळी केली. क्लासिक बॅटिंग प्रेक्षकांना पहायला मिळाली.

डु प्लेसीने काल कठीण परिस्थितीत त्याचा सर्वोत्तम खेळ दाखवला. आरसीबीचे टॉपचे चार फलंदाज 62 धावात तंबूत परतले होते. त्यांचा डाव अडचणीत होता. अशा परिस्थितीत डु प्लेसीने डाव सावरलाच पण संघाला एक भक्कम स्थितीमध्ये नेऊन ठेवलं.