मोबाईलचे इंटरनेट स्लो चालतंय, हे आहे मोठे कारण, नेटवर्क..
अनेकदा आपल्याला मोबाईलच्या स्क्रीनवर नेटवर्क फुल दिसते पण आपले इंटरनेट चालत नाही. मात्र, त्यामागे अनेक मोठी कारणे आहेत. ज्यामुळे ही समस्या होते. ती कारणे नक्की कोणती हे जाणून घेऊयात.

आपण अनेकदा बघतो की, मोबाईलला रेंज फुल असते पण आपले इंटरनेट चालत नाही. अशावेळी आपल्यालाही कळत की, मोबाईलला रेंज पूर्ण आहे पण नेटवर्क नक्की का हळू चालत आहे.
आपण अशावेळी संबंधित कंपनीला दोष देतो. पण प्रत्यक्षात तसे काही नसते. आपल्या फोनमध्ये दिसणारे सिग्नल फक्त हेच सांगतात की, तुमच्या फोनजवळ सिग्नल किती जवळ आहे.
तुमचा फोन जवळच्या मोबाईलशी किती कनेक्ट आहे. त्याचा इंटरनेट स्पीडसोबत काहीच संबंध नसतो. फूल सिग्नल असून मोबाईलचे इंटरनेट स्लो चालण्याचे प्रमुख कारण हे असते की, त्या एका टॉवरवर किती लोड आहे.
आजुबाजूला जेव्हा जास्त लोक असतात, अशावेळी त्या एकाच टॉवरवर लॉड येतो. मॉल, रेल्वे स्टेशन, अशावेळी गर्दी प्रचंड असते. त्यामुळे एकाचवेळी एका टॉवरशी अनेक मोबाईल कनेक्ट असतात.
आपल्या मोबाईलवर सिग्नल फुल दाखवते. पण अनेक लोक असल्याने आपले इंटरनेट स्लो होते. अनेकदा आपल्या फोनमध्ये आपण अनेक अॅप्स सुरू करतो, त्यामुळेही त्याचा थेट परिणाम इंटरनेटच्या स्पीडवर होतो.