
भारतीय डाक विभागामध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

भारतीय डाक विभागाकडून ही भरती प्रक्रिया ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) साठी सुरू आहे. केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी नक्कीच आहे.

विशेष म्हणजे तगडा पगार देखील निवड झालेल्या उमेदवारांना मिळणार आहे. ही भरती प्रक्रिया 78 पदांसाठी होत आहे. या indiapost.gov.in.वर जाऊन उमेदवारांना अर्ज या भरतीसाठी करावे लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज जरी आॅनलाईन पद्धतीने केला असला तरीही या अर्जाची हार्ड कॉपी आपल्याला 16 फेब्रुवारीपर्यंत सबमिट करावी लागेल.

व्यवस्थापक (GRA), मेल मोटर सर्व्हिस कानपूर, उत्तर प्रदेश येथे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. चला तर मग फटाफट करा अर्ज.