
अभिनेत्री प्रियंका चाहर चौधरी हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. प्रियंका चाहर चौधरी ही बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना दिसली. तिची लवकरच एक वेब स्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वेब सीरिजच्या सेटवरील काही फोटोही मध्यंतरी व्हायरल होताना दिसले. आता प्रियंका चाहर चाैधरी हिच्याबद्दल अत्यंत मोठी बातमी पुढे येताना दिसत आहे.

नागिन 7'साठी प्रियंका चाहर चौधरी हिला कास्ट केले गेल्याचे सांगितले जाते. हेच नाही तर तिचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रियंका चाहर चौधरी ही गेल्या काही दिवसांपासून सतत कामाच्या शोधात होती. आता तिला नागिन मालिका मिळाल्याचा खुलासा करण्यात आला.

प्रियंका चाहर चौधरीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोशल मीडियावरही प्रियंका ही सक्रिय दिसते.