
'रिमझिम: छोटी उमर बडा सफर' यामालिकेच्या बुधवारच्या (28 जानेवारी) एपिसोडमध्ये एक इंटीमेट सीन दाखवण्यात आला होता. यामध्ये समीर (हिमांशु अवस्थी) रिमझिमसमोर (यशिका शर्मा) त्याचा शर्ट काढतो आणि तिला स्वत:कडे खेचतो. रिमझिमच्या ब्लाऊजची बटणं उघडी असल्याने तो तिला शर्ट घालतो.

मालिकेतील हा सीन पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. इतक्या कमी वयाच्या अभिनेत्रीकडून असे सीन्स करून घेणं योग्य आहे का, असा सवाल प्रेक्षकांनी केला आहे. या मालिकेच्या आधीच्या एपिसोडमधीलही सीन व्हायरल झाला असून त्यामध्येही दोघं इंटीमेट होताना दिसत आहेत.

रेडिट आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेटकऱ्यांनी या सीनवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर कथेत असे सीन्स दाखवायचेच होते, तर 18 वर्षांवरील अभिनेत्रीला का निवडलं नाही, असाही प्रश्न काहींनी विचारला आहे.

टीव्ही इंडस्ट्रीत 15 ते 18 वयोगटातील अभिनेत्रींचे असे रोमँटिक सीन्स दाखवण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे, असं म्हणत काहींनी यशिकाच्या आई-वडिलांनी यात आक्षेप घ्यावा, अशी मागणी केली आहे.

'रिमझिम: छोटी उम्र बडा सफर' या मालिकेतील मुख्य अभिनेत्री यशिका शर्मा ही फक्त 16 वर्षांची असल्याचं म्हटलं जात आहे. तर यातील अभिनेता हिमांशू हा 24 वर्षांचा आहे.