रात्रभर पार्टी, नंतर गोळ्यांचा…रिंकू मजूमदार यांच्या मुलाची हत्या की मृत्यू, धक्कादायक कारण समोर!

भाजपाचे नेते तथा पश्चिम बंगालचे भाजपाचे माजी अध्यक्ष दिलीप घोष यांचा सावत्र मुलगा श्रींजय दासगुप्ता यांचा संशयास्पद मृत्यू झाला.

| Updated on: May 13, 2025 | 9:57 PM
1 / 6
भाजपाचे नेते तथा पश्चिम बंगालचे भाजपाचे माजी अध्यक्ष दिलीप घोष यांचा सावत्र मुलगा श्रींजय दासगुप्ता यांचा संशयास्पद मृत्यू झाला. श्रींजय दासगुप्ता याच्या आईचे नाव रिंकू मजूमदार असे आहे. काही दिवसांपूर्वी रिंकू मजूमदार आणि दिलीप घोष यांचे लग्न झाले आहे.

2 / 6
मंगळवारी रिंकू मजूमदार यांचा मुलगा श्रींजय दासगुप्ता न्यूटाऊन येथील सपोर्जी हाऊसिंग येथे बेशुद्धावस्थेत सापडला होता. दासगुप्ता हा आयटी क्षेत्रात नोकरी करायचा. बेशुद्धावस्थेत सापडल्यानंतर त्याला बिधानानगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

3 / 6
मंगळवारी श्रींजय दासगुप्ता याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. बिधाननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रींजय सोमवारी रात्री उशिरापर्यंत सापुरजी हाऊसिंग कॉम्प्लेक्स येथील आपल्या राहत्या घरात मित्रांसोबत पार्टी करत होता. या घरात नाईट पार्टी झाली होती.

4 / 6
सूत्रांच्या माहितीनुसार श्रींजय नेहमीप्रमाणे सोमवारी त्याच्या ऑफिसला गेला होता. संध्याकाळी तो घरी परत आला होता. रात्र झाल्यानंतर त्याचे मित्र घरात येताना दिसत होते. पण हे मित्र नेमके कोण होते, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस या मित्रांचा शोध घेत आहेत.

5 / 6
श्रीजयच्या मृतदेहाजवळ काही औषधी गोळ्या मिळाल्या होत्या. प्राथमिक माहितीनुसार श्रींजयचा मृत्यू नशेच्या गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे झाला आहे.

6 / 6
श्रींजयचा मृत्यू गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे झाला की त्याची हत्या झाली, याचा पोलीस शोध घेत आहेत.