AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगेंचा 500 कोटींचा आरोप, शिंदे गटाकड़ून पहिली प्रतिक्रिया, बडा मंत्री म्हणाला, आता…

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या नावाने भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आता त्यांच्या या आरोपांवर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मनोज जरांगेंचा 500 कोटींचा आरोप, शिंदे गटाकड़ून पहिली प्रतिक्रिया, बडा मंत्री म्हणाला, आता...
Eknath Shinde and Manoj JarangeImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 22, 2026 | 12:59 PM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला. माझ्या नावाने भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. याचा पुरावा म्हणून ऑडीओ क्लिप असल्याचे देखील जरांगे यांनी म्हटले. आता या ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. यावर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांना उत्तर दिले आहे. संजय शिरसाट म्हणाले की, आज घेतलेल्या पत्रकार परिषेदनंतरचं माझं सुद्धा एक मत झाले आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. पुन्हा एकदा दूध का दूध पानी का पानी झालंच पाहिजे. कोण एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात आहे, कोण जरांगे पाटील यांच्या विरोधात आहेत? कोण कोणाला बदनाम करत आहे? कोणी कोणाला सुपारी दिली? या सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत. मी तर जरांगे पाटीलांना विनंती करणार तुमच्याकडे अशी काही नावं असतील तर जायदाही करुन टाका. ज्यामुळे कमीत कमी करणाऱ्याला भीती तर वाटली पाहिजे. त्यालाही वाटले पाहिजे की आपण उघडे पडू म्हणून. हे एकदा झालं पाहिजे.

पुढे ते म्हणाले की, रोज एकमेकांचे डोकं फोडणं, रोज एकमेकांच्या विरोधात बोलणं हे परवडणारे नाहीये. राजकारण वेगळं हे सोडून द्या. पण समजा समाजामध्ये तेढ निर्माण झाली तर त्याचे परिणाम चांगले नसणार. या उलट या प्रकरणात तर आम्ही एकमेकांच्या विरोधात का भांडत आहोत हाच प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. म्हणून या माध्यमातून सांगेन की जी जरांगे पाटीलांनी जी मागणी केली तिच मागणी एकनाथ शिंदेंनी केली. म्हणून याची चौकशी झाली पाहिजे. यातून सत्य काय आहे? हे बोलणारे कोण होते? यांची नावे काय आहेत? यांनी असं का बोलावं? हे नेमके कोणाचे समर्थक आहेत. हे सर्व महाराष्ट्राला कळायला पाहिजे. जी काही बातमी चालली होती तिला आता पूर्णविराम मिळेल आणि याची खऱ्या अर्थाने चौकशीला सुरुवात होईल.

मनोज जरांगे पाटील यांचे आरोप काय?

मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा आरोप केला होता. भाजपकडून 500 कोटी रुपये घेऊन ते मला दिल्याचे भाजपला सांगितले का? असा सवाल जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना केला होता. यावर एकनाथ शिंदेंनी आपण कोणाकडून पैसे घेतलेही नाही आणि दिलेही नाहीत म्हणत पुरावे द्यावेत असे म्हटले होते. यानंतर एक कथित रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून यामध्ये एका महिलेचा हिंदीमधला संवाद ऐकायला येत आहे. आता यावर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे.

Follow Us
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; AQI थेट...
Mumbai Air Pollution : मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; नागरिकांच्या आरोग्याला धोका, AQI थेट...