Rinku Rajguru: अखेर रिंकूने आकाशसोबतच्या नात्यावर सोडले मौन, ‘तेव्हापासून आमच्यात…’

Rinku Rajguru: अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यात सर्वजण उत्सुक असतात. ती अभिनेता आकाश ठोसरला खरच डेट करत आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आता रिंकूने यावर वक्तव्य केले आहे.

| Updated on: Aug 30, 2025 | 1:02 PM
1 / 5
'सैराट' या सिनेमातून घराघरात पोहोचणारी जोडी म्हणजे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर. पहिल्याच सिनेमातून दोघांनाही प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले. आता त्यांना कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. रिंकू आणि आकाश एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता अखेर रिंकून त्यांच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

2 / 5
रिंकूने नुकताच सकाळ प्रीमिअरला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला आकाश ठोसरसोबत असलेल्या नात्यावर प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर रिंकूने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

3 / 5
रिंकू आकाशसोबत असलेल्या नात्याविषयी बोलताना म्हणाली, 'आमची मैत्री खूपच चांगली आहे. म्हणजे तेव्हापासून आमच्यात मैत्री आहे. आम्हाला काहीही वाटलं तरी आम्ही फोनवर बोलतो.'

4 / 5
पुढे ती म्हणाली, 'जसं की मी त्याला फोन करून म्हणाले की मला बोअर होतंय, तू मुंबईला येशील का? मग आपण अमुक असा शो बघायला जाऊ किंवा मी पुण्याला गेले की एखाद्या कॅफेमध्ये बसून अमुक असा चित्रपट पाहिला का? पुस्तक वाचलंस का? मला अमुक या व्यक्तीचं काम खूप आवडलं. तसंच आम्ही एकमेकांना विविध मुलाखतीदेखील सुचवत असतो.'

5 / 5
'आम्ही सतत बोलत असतो. त्यामुळे आमच्यात खूप चांगली मैत्री आहे. मित्र म्हणून आमच्यात पारदर्शकता आहे' असे रिंकू म्हणाली.