AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्लफ्रेंडला पटवण्यासाठी ऑरीने थेट आणला LPG सिलिंडर्सचा ट्रक; व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क!

गर्लफ्रेंडला पटवण्यासाठी ऑरीने थेट एलपीजी सिलिंडर्सच्या ट्रकचं आमिष दाखवलं आहे. सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. पहा हा व्हिडीओ-

गर्लफ्रेंडला पटवण्यासाठी ऑरीने थेट आणला LPG सिलिंडर्सचा ट्रक; व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क!
OrryImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 17, 2026 | 12:47 PM
Share

अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ला केल्यापासून जगभरात त्याचे पडसाद उमटले आहेत. या युद्धामुळे भारतात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. तुटवड्यामुळे घरगुती सिलिंडर वितरणाला सरकारकडून प्राधान्य दिलं जात असलं तरी अनेकांना सिलिंडरसाठी बुकिंगनंतरही बरेच दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. एलपीजी सिलिंडरचा मुद्दा सध्या अत्यंत गंभीर असून अनेक ठिकाणी सिलिंडरचा काळाबाजारही उघड होत आहे. एलपीजी सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांकडून विविध पर्याय अवलंबले जात आहेत. अशातच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अनेक स्टारकिड्सचा जिवलग मित्र ओरहान अवत्रमणी ऊर्फ ऑरी याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

जान्हवी कपूर, खुशी कपूर, सारा अली खान, सुहाना खान, निसा देवगण यांसारख्या स्टारकिड्सचा खास मित्र असलेला ऑरी हा सोशल मीडियावर विविध रील्स पोस्ट करत असतो. त्याच्या रील्सला लाखो व्ह्यूज मिळतात. नुकतीच त्याने एलपीजी सिलिंडरबाबत एक मजेशीर रील पोस्ट केली आहे. जान्हवी आणि खुशी कपूरचे वडील आणि प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांच्यासोबत त्याने हा व्हिडीओ शूट केला आहे. यामध्ये बोनी कपूर हे मुलीचे वडील असून ऑरी त्यांच्या मुलीसाठी मागणी घालतो. “मी तुमच्या मुलीवर खूप प्रेम करतो”, असं ऑरी म्हणताच बोनू कपूर त्याला विचारतात, “पण तुझ्याकडे तिला देण्यासाठी काय आहे?”

View this post on Instagram

A post shared by Orhan Awatramani (@orry)

या प्रश्नाचं उत्तर देताना ऑरी थेट एलपीजी सिलिंडरचा ट्रकच दाखवतो. कधी सिलिंडर उचलताना तर सिलिंडरची गाडी चालवताना तो पुढे दिसतो. ऑरीच्या या विनोदबुद्धीवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. या व्हिडीओवर खुशी कपूरनेही कमेंट केलं आहे. ‘कोणत्या मुलीसाठी विचारतोय’, असा सवात तिने केला आहे. त्यावर ऑरीने खुशी आणि अंशुला या दोघींची नावं लिहिली आहेत. ऑरीच्या या रीलला तब्बल 4.9 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत, तर 282 हजार लाइक्स मिळाले आहेत.

दरम्यान एलपीजीचा तुटवडा असताना अनेक ठिकाणी त्याचा काळाबाजारही सुरू आहे. 16 मार्च 2026 रोजी उपनियंत्रक शिधावाटप, ‘फ’ परिमंडळ ठाणे यांच्या वतीने घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष कारवाई करण्यात आली. या मोहिमेत ठाणे परिमंडळातील विविध भागांमध्ये तपासणी करण्यात आली. अहवालानुसार, एकूण 247 ठिकाणी तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान 483 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून जप्त मालाची एकूण किंमत 3 लाख 21 हजार 222 रुपये इतकी आहे.

Follow Us
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच