
शेवटच्या ओव्हरमध्ये सलग पाच सिक्स मारत संघाला विजय मिळवून दिला होता. याआधी रिंकू चर्चेत असायचा पण या मॅचविनिंग खेळीनंतर गडी रातोरात स्टार झाला. गरीब घरातून असलेल्या या पोराचं अवघ्या क्रिकेट जगताने कौतुक केलं.

रिंकू सिंग मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो शर्टलेस दिसत आहे.

रिंकू सिंगचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.

रिंकू सिंगच्या फोटोवर शुबमन गिल याची बहिण शहनील गिल हिने केलेली कमेंट व्हायरल होत आहे. रिंकूच्या फोटोवर तुने 'Oo hero' असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर यावरून दोघांबाबत अनेत तर्कवितर्क लावले जात आहेत.