हैदराबादच्या मालकिणीनंतर आता केकेआरच्या स्टारची लगीनघाई, PM मोदींना निमंत्रण

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंह लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. या खास सोहळ्यासाठी त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. कुटुंबासह मोदींच्या निवासस्थानी पोहोचलेल्या रिंकूने त्यांना लग्नाची पत्रिका दिली. या भेटीचे खास फोटो सध्या समोर आले आहेत.

| Updated on: Nov 15, 2026 | 6:36 PM
1 / 5
स्टार भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, या विवाहसोहळ्याला अनेक सेलिब्रिटी पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

स्टार भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, या विवाहसोहळ्याला अनेक सेलिब्रिटी पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

2 / 5

यामध्ये सर्वात प्रमुख उपस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी लावू शकतात, त्यांना लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी रिंकू सिंग नवी दिल्लीला गेले होते.

3 / 5

आज रविवारी १५ नोव्हेंबर रोजी, रिंकूने आपल्या कुटुंबीयांसह पंतप्रधान मोदींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांना लग्नाचे आमंत्रण व पत्रिका दिली.

4 / 5

रिंकू उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्याशी विवाह करणार आहे. या दोघांचा जून २०२५ मध्ये साखरपुडा झाला.

5 / 5

रिंकू आणि प्रियाचा विवाहसोहळा ४ डिसेंबर रोजी लखनौमध्ये पार पडणार आहे. या लग्नाला भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. (सर्व फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us