रुमानी खरेच्या सोनेरी साडी अन् हटके ब्लाऊजने वेधलं लक्ष, फोटो पाहून…
समुद्राच्या किनारी रुमानी खरेचा रॉयल अंदाज; संदीप खरे यांच्या लेकीच्या फोटोशूटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष. हटके पोज पाहून चाहत्यांनी केलं कौतुक.
1 / 5

प्रसिद्ध कवी आणि गायक संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे सध्या तिच्या सुंदर फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
2 / 5
समुद्राच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या फोटोशूटमध्ये रुमानीचा पारंपरिक आणि मॉडर्न लूक पाहायला मिळत आहे.
3 / 5
या फोटोशूटसाठी रुमानीने चकाकणारी सोनेरी टिश्यू-सिल्क साडी नेसली आहे. या साडीमध्ये तिचा लूक अत्यंत रॉयल आणि आकर्षक दिसत आहे.
4 / 5
साडीला मॉडर्न टच देण्यासाठी तिने लाल रंगाचा ऑफ-शोल्डर ट्यूब ब्लाऊज परिधान केला आहे. रुमानीने आपल्या लूकला उठावदार बनवण्यासाठी सुंदर पारंपरिक दागिन्यांची निवड केली आहे.
5 / 5
समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गरम्य पार्श्वभूमी आणि रुमानीचा सुंदर पेहराव यामुळे हे फोटोशूट अधिकच खास ठरलं आहे. तिच्या या रॉयल लूकवर नेटकरी भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us