
जळगाव जिल्ह्यातील पाचोर्याच्या सातगाव डोंगरी परिसरात एक अजब घटना घडली आहे. इथे एक वेगळीच अफवा पसरल्याचे समोर आले. या अफवेमुळे लोक थेट सैरावैरा पळत सुटले होते. ही घटना सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे.

या अफवेमुळे काही काळ ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या गावात थेट धरण फुटल्याची अफवा पसरली होती. ही अफवा पसरताच गावातील ग्रामस्थ सैरावैरा धावू लागले. या अफवेमुळे तर काही लोकांनी गावदेखील सोडल्याचे समोर आले.

मात्र काही सुज्ञ तरुणाने घाबरून न जाता प्रत्यक्ष धरणावर जाऊन चित्रीकरण केले. आणि ही चित्रफित सर्व ग्रामस्थांना दाखवली. त्यामुळे धरण फुटले नसल्याचे पाहून सर्व ग्रामस्थांना दिलासा मिळाला. पण सध्या या अफवेमुळे सर्वच ग्रामस्थांची झोप मात्र उडाली होती.

सातगाव डोंगरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे ग्रामस्थ, शेतकरी संकटात सापडले आहेत. याच पावसामुळे धरण फुटल्याची अफवा पसरली होती.

या अफवेला बळी पडून काही ग्रामस्थांनी थेट गाव सोडलं. काही ग्राममस्थ डोंगरावर धावत सुटले होते. मात्र तरुणांनी गावकऱ्यांना चित्रफित दाखवल्यामुळे आता धरण फुटल्याची फक्त अफवा होती, असे समजून ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.