
अमेरिकन अब्जाधीश मीडिया बिझनेसमॅन रुपर्ट मर्डोक वयाच्या 91 व्या वर्षी अभिनेत्री जेरी हॉलला घटस्फोट देणार आहेत. त्यांचा हा चौथा घटस्फोट असेल. त्यांनी 2016 मध्ये 65 वर्षीय जेरीसोबत लग्न केले होते.

मीडिया रिपोर्टनुसार सहा वर्षांनी दोघेही आपलं लग्न मोडणार आहेत. अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांसह मरडॉकच्या जगभरातील मीडिया नेटवर्कमध्येही त्यांच्या घटस्फोटाची चर्चा झळकल्या आहेत .

मर्डोकने मार्च 2016 मध्ये जेरीशी लंडनमध्ये लग्न केले. गेल्या वर्षी मर्डोकने न्यूयॉर्कच्या टॅव्हर्न ऑन द ग्रीनमध्ये त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा केला होता. मर्डोकच्या मीडिया व्यवसायांमध्ये फॉक्स कॉर्पोरेशन, फॉक्स न्यूज चॅनेलची मूळ कंपनी आणि वॉल स्ट्रीट जर्नल्स न्यूज कॉर्प यांचा समावेश आहे.

रुपर्ट मर्डोकचे पहिले लग्न पॅट्रिशिया बुकरशी झाले होते. ते लग्न 1956 ते 1967 पर्यंत चालले. यानंतर दुसरे लग्न अन्ना मारिया टोर्वशी झाले. ते लग्न 1967 ते 1999 पर्यंत चालले. त्यानंतर मर्डोकने 1999 मध्ये वेंडी डेंगशी तिसरे लग्न केले. ते 2013 पर्यंत चालले. मर्डोकने 2016 मध्ये जेरी हॉलशी लग्न केले.

जेरीने 'बॅटमॅन' आणि 'द ग्रॅज्युएट' सारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. मर्डोकच्या आधी, जेरी हॉलने रॉक स्टार आणि गायक मिक जॅगरशी लग्न केले होते.

जेरी आणि मर्डोक यांना वेगवेगळ्या लग्नापासून आतापर्यंत झालेली एकूण 10 मुले आहेत. दोघांनीही आत्तापर्यंत वेगवेगळी लग्नं केली आहेत. २०१६ मध्ये रुपर्ट मर्डोक यांनी जेरीशी लग्न केल्यानंतर प्रचंड आनंद व्यक्त केला