Dharmndra Pradhan : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते RUSH संमेलनाचे उद्घाटन

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि फ्रान्सच्या डिजिटल व्यवहार दूत क्लारा चाप्पाझ यांनी 'RUSH' संमेलनाचे उद्घाटन केले. शाश्वत विकास तसेच जागतिक शांतता, स्थैर्य आणि सर्वांगीण कल्याणासाठी अर्थपूर्ण सहकार्य वाढवूया असं आवाहन त्यांनी केलं.

| Updated on: Feb 18, 2026 | 4:06 PM
1 / 5
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि फ्रान्सच्या डिजिटल व्यवहार दूत क्लारा चाप्पाझ यांनी 'RUSH' संमेलनाचे उद्घाटन केले. या उच्चस्तरीय कार्यक्रमात भारत आणि फ्रान्समधील शैक्षणिक, संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर दिला जात आहे. AI चे लोकशाहीकरण, प्रगत संशोधन आणि शाश्वत विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे जागतिक शांतता आणि समृद्धीला चालना मिळेल.

2 / 5
यासंबंधी त्यानी ट्विटरवर पोस्ट लिहीत माहिती दिली. 'Clara Chappaz मॅडम यांच्यासह, डिजिटल व्यवहार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक फ्रान्सच्या राजदूत, फ्रान्सने All India Institute of Medical Sciences, New Delhi येथे आयोजित करण्यात आलेल्या RUSH—भारत-फ्रान्स सहकार्याच्या भविष्यावरील उच्चस्तरीय शैक्षणिक आणि वैज्ञानिक परिषद—याच्या उद्घाटन प्रसंगी फ्रान्स आणि भारतातील मान्यवर मित्र, प्राध्यापक, संशोधक आणि नवोन्मेषक यांचे स्वागत केलं' असं त्यांनी लिहीलं.

3 / 5
ज्ञान हा आपल्या दोन्ही देशांमधील सर्वात मजबूत दुवा आहे. ही उच्चस्तरीय शैक्षणिक आणि वैज्ञानिक परिषद आपल्या शैक्षणिक आणि संशोधन सहकार्याला अधिक चालना देईल तसेच नवोन्मेषासाठी आपली बांधिलकी अधिक बळकट करण्यासाठी नवी संधी निर्माण करेल, असंही त्यांनी नमूद केलं.

4 / 5
कृत्रिम बुद्धिमत्तेचे लोकशाहीकरण, अत्याधुनिक संशोधनाची प्रगती आणि दीर्घकालीन समृद्धी, शाश्वत विकास तसेच जागतिक शांतता, स्थैर्य आणि सर्वांगीण कल्याणासाठी अर्थपूर्ण सहकार्य वाढवूया असं आवाहन त्यांनी केलं.

5 / 5
या सोहळ्याची काही क्षणचित्रही त्यांनी त्यांच्या अकाऊंटवर शेअर केली.  दिल्लीत सुरू असलेल्या या समिटसाठी देशातूनच नव्हे तर जगभरातून अनेक लोक आले आहेत. यावेळी आयएची आव्हानं आणि एआयचे फायदे यावर चर्चा करण्यात येत आहे. एआयमुळे जग कसं बदलणार आहे. आणि एआय ही काळाची कशी गरज आहे, याचीही माहिती यात देण्यात येत आहे.