PHOTO | जैसलमेरच्या शाळेचा खास ‘गणवेश’, मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी सब्यासाचीचा पुढाकार!

मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्याने जैसलमेरमधील एका मुलींच्या शाळेचा ‘गणवेश’ डिझाइन केला आहे.

Harshada Bhirvandekar | Updated on: Oct 15, 2020 | 1:17 PM
1 / 10
सब्यासाची मुखर्जी हा बॉलिवूडचा सगळ्यात प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे.

सब्यासाची मुखर्जी हा बॉलिवूडचा सगळ्यात प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे.

2 / 10

अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या लग्नात आणि इतर खास सोहळ्यात सब्यासाचीने डिझाइन केलेले कपडे परिधान केले होते.

3 / 10

सगळ्यात महागड्या फॅशन डिझायनर्समध्ये सब्यासाचीचे नाव घेतले जाते. त्याने डिझाइन केलेल्या कपड्यांना विशेष प्राधान्य दिले जाते.

4 / 10

डिझाइन्ससाठी जितका सब्यासाची प्रसिद्ध आहे, तितकाच तो त्याच्या सामाजिक कार्यासाठीदेखील नावाजला जातो.

5 / 10

मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्याने जैसलमेरमधील एका मुलींच्या शाळेचा ‘गणवेश’ डिझाइन केला आहे.

6 / 10

जैसलमेरमधील ‘राजकुमारी रत्नावती गर्ल्स हायस्कूल’च्या या खास गणवेशाचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

7 / 10

निळ्या आणि मरून रंगात हा खास गणवेश डिझाइन करण्यात आला आहे. राजस्थानच्या पारंपरिक नक्षीकामाचे चित्र या गणवेशावर पाहायला मिळते.

8 / 10

शिक्षणामुळे मानवाची प्रगती झाली आहे. त्यामुळे शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचे असल्याचे, सब्यासाची म्हणतो.

9 / 10

एका अमेरिकन सामाजिक संस्थेने सब्यासाचीला त्यांच्या या प्रोजेक्टवर काम करण्यास आमंत्रित केले होते.

10 / 10

आपण समाजाचे देणे लागतो, या उक्तीवर चालणाऱ्या सब्यासाचीने मोठ्या आनंदाने हा गणवेश डिझाइन केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us