
सारा तेंडुलकर हिचा फॅशन सेन्स नेहमी चर्चेत असतो. एखादा इव्हेंट असो की मित्रांची पार्टी साराच्या स्टाइल स्टेटमेंटकडे लोकांचे लक्ष वेधले जाते. सोशल मीडियावर ती नेहमी सक्रीय असते. तिचे इस्टाग्रामवर तिचे 6.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.

12 ऑक्टोंबर 1997 रोजी जन्मलेली सारा सचिन तेंडुलकर आणि डॉक्टर अंजली तेंडुलकर यांची मुलगी आहे. वडिलांचा व्यवसाय आईचा वैद्यकीय व्यवसाय यापेक्षा वेगळी वाट साराने निवडली. आता ग्लॅमर वर्ल्डमध्ये तिने स्वत:च्या बळावर कोट्यवधीची संपत्ती जमवली.

साराने आईप्रमाणे वैद्यकीय विभागाचे शिक्षण घेतले. तिने बायोमेडिकल सायन्समध्ये पदवी घेतली. त्यानंतर क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये पदवीत्तर शिक्षण घेतले. ती AfN ची नोंदणीकृत असोसिएट न्यूट्रिशनिस्ट आहे.

रेड कारपेट इव्हेंट्सपासून पडद्याच्या मागेही साराचा सहभाग असतो. साराने आपला ऑनलाइन व्यवसाय उभारला आहे. सारा तेंडुलकर शॉप नावाने एक ऑनलाइन स्टोअर चालवते. तसेच भारतात कोरियाचा ब्यूटी ब्रँड लैनिगेची ब्रँड एंबेसडर आहे. तिला एंडोर्समेंटमधून चांगले उत्पन्न आहे.

सारा तेंडुलकर फंक्शनल न्यूट्रिशन कोच म्हणून काम करते. आरोग्य क्षेत्रावर लक्ष केंद्रित करुन ती आणखी कौशल्ये विकसित करण्याच्या मार्गावर आहोत. म्हणजेच ती केवळ पोषण न्यूट्रिशन तज्ज्ञ नाही तर मॉडेलसुद्धा आहे.