Sara Tendulkar-Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरची लेक अन् सून वेस्टर्न फॅशनमध्ये सरस, अर्जुनच्या हटके लूकने वेधलं सर्वांचं लक्ष
Sara Tendulkar-Arjun Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरांची मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्यातील बॉन्डिंग नेहमीच चर्चेत असते. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. नुकतेच सारा, अर्जुन आणि त्याची पत्नी सानिया चंडोक हे तिघेही एअरपोर्टवर एकत्र दिसले. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी प्रेमाचा वर्षाव देखील केला आहे.

सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील भाऊ अर्जुन तेंडुलकर आणि वहिनी सानिया चंडोक यांना नुकतेच एअरपोर्टवर एकत्र स्पॉट करण्यात आले. तिघांना एकत्र पाहून चाहत्यांचंही लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं.
एअरपोर्टवर सारा तेंडुलकर पांढऱ्या रंगाच्या ट्रॅकसूटमध्ये दिसली. केसांना पोनीटेल बांधून तिने लूक पूर्ण केला होता. कानात स्टड इअररिंग्स आणि हलक्या मेकअपमध्ये सारा अतिशय सुंदर दिसत होती. अनेकांना तिचा लूक आवडलेला आहे.
सारा तेंडुलकर आणि तिची वहिनी सानिया चंडोक यांच्यातही खूप छान नातं आहे. दोघी अनेकदा एकत्र दिसतात. एकमेकींसोबत वेळ घालवतानाचे त्यांचे फोटोही चाहत्यांना आवडतात. दोघींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
अर्जुन तेंडुलकरची पत्नी सानिया चंडोक हिनेदेखील एअरपोर्टसाठी कॅज्युअल वेस्टर्न लूक निवडला. काळ्या रंगाची जीन्स, पांढरा टी-शर्ट आणि डेनिम जॅकेट असा तिचा लूक सर्वांच लक्ष वेधून घेणारा होता. मोकळे केस, हलका मेकअप आणि स्नीकर्समध्ये सानिया खूपच सुंदर दिसत होती.
यावेळी अर्जुन तेंडुलकरही कॅज्युअल लूकमध्ये दिसला. एअरपोर्टवर तो पत्नी सानिया आणि बहीण सारा यांची काळजी घेताना दिसला. तिघांचे एकत्र दिसणं चाहत्यांसाठी खास ठरलं. सोशल मीडियावर कायम त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
सारा, अर्जुन आणि सानिया हे तिघेही एकत्र कुठे जात होते, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, तिघांची एअरपोर्टवरील झलक पाहून चाहत्यांचा दिवस नक्कीच खास झाला. त्यांच्या साध्या आणि स्टायलिश लूकची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.