Sachin Tendulkar: मी तुम्हाला माझ्या शरीराचा एक भागच सुपूर्द करतोय… सचिन तेंडुलकरांची भावूक प्रतिक्रिया, असं काय घडलं?

Sachin Tendulkar News: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांनी आता एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी ते जे म्हणाले त्याची चर्चा होत आहे.

| Updated on: Nov 17, 2026 | 12:59 PM
1 / 5
भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी सोमवारी व्यक्त केल्या. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या शरद पवार क्रिकेट संग्रहालयाला त्यांनी २५ बॅट आणि वस्तू भेट म्हणून दिल्या. त्यावेळी ते भावूक झाले.

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी सोमवारी व्यक्त केल्या. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या शरद पवार क्रिकेट संग्रहालयाला त्यांनी २५ बॅट आणि वस्तू भेट म्हणून दिल्या. त्यावेळी ते भावूक झाले.

2 / 5

यावेळी सचिन यांची पत्नी अंजली, मुलगी सारा, मुलगा अर्जुन आणि कुटुंबीय उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींवर भाष्य केले आहे.

3 / 5

" माझे क्रिकेट किट हा माझ्या शरीराचा एक भागच आहे. त्यातील वस्तू आणि बॅट आज मी तुम्हाला भेट म्हणून देतोय, असं समजा की, मी माझ्या शरीराचा एक भागच तुम्हाला सुपूर्द करत आहे. त्याला तुम्ही जपा...’, अशा भावना भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केल्या.

4 / 5

‘माझ्या किट बॅगेतील बॅट, ग्लव्हज, हेल्मेट, पॅड आणि कॅप अशा सगळ्या गोष्टी मी आजपर्यंत जीवापाड जपल्या आहेत. वर्षानुवर्षे जपलेला हा ठेवा आता मी तुमच्या स्वाधीन करत आहे, या खजिन्यात आयुष्यातील पहिली बॅटही आहे. जी माझी बहीण सविताने खास काश्मीरहून आणली होती." असं म्हणत सचिन तेंडुलकर भावूक झाले.

5 / 5

आपल्या निवृत्तीच्या भाषणाचे मुद्दे सचिन यांनी ज्या कागदावर लिहून ठेवले होते, तो कागदही या संग्रहालयात भेट म्हणून ठेवण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us