चिमुकलीचे भाषण ऐकून सचिन तेंडुलकरही भारावला, कौतुक करत म्हणाला…

भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर क्रिकेटचे देव आहेत... अनेकांच्या प्रेरणासाठी सचिन आहेत. पण एका चिमुकलीचं भाषण ऐकून सचिन तेंडुलकर यांनी मुलीचं भरभरुन कौतुक केलं. रिद्धी असं चिमुकलीचं नाव आहे... सध्या तिचं भाषण आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Updated on: Apr 29, 2026 | 12:00 PM
1 / 5
मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरला आज पालघरच्या गुहिर येथील चौथीत शिकणाऱ्या एका चिमुकल्या आदिवासी विद्यार्थिनीच्या भाषणाची भुरळ पडली. तिचं भाषण संपल्यानंतर सचिन यांनी तिचं कौतुक देखील केलं.

मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरला आज पालघरच्या गुहिर येथील चौथीत शिकणाऱ्या एका चिमुकल्या आदिवासी विद्यार्थिनीच्या भाषणाची भुरळ पडली. तिचं भाषण संपल्यानंतर सचिन यांनी तिचं कौतुक देखील केलं.

2 / 5

पालघरच्या वाडा तालुक्यातील गुहीर येथे आज सचिन फाउंडेशन च्या माध्यमातून 130 घरांसाठी सोलर पॅनलचा संच बसवण्यात आला.याचं उद्घाटन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सारा तेंडुलकर आणि सानिया तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात आल.

3 / 5

यावेळी सचिनच्या व्यासपीठावरील भाषणाआधी एका चिमुकल्या आदिवासी विद्यार्थिनीने भाषण केलं असून या भाषणानंतर सचिन तेंडुलकरने या चिमुकल्या विद्यार्थिनीला मिठी मारत तिचं तोंड भरून कौतुक केलं. रिद्धी असं या मुलीचं नाव आहे.. असं म्हणत सचिन यांनी तिचं कौतुक केलं.

4 / 5

ग्रामीण भागातील असून देखील इतक्या लहान वयात ही चिमुकली इतक्या आत्मविश्वासाने भाषण करत असल्याने याच ग्रामीण भागात पुढे देश घडवणारे तरुण तयार होतील असा विश्वास देखील तेंडुलकर यांनी यावेळी व्यक्त केला.

5 / 5

सांगायचं झालं तर, प्रकल्पाच्या लोकार्पणासाठी सचिन तेंडुलकर यांची लेक सारा तेंडुलकर, सून सानिया तेंडुलकर, सरपंच सरिता गायकर, स्थानिक नागरिक आणि मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी देखील उपस्थित होते. पण रिद्धी हिच्या भाषणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us