
बॉलिवूड स्टार किड्सच्या चित्रपट पदार्पणाकडे सर्वांच्या नजरा लागल्या असतात. पण आता क्रिकेटर सचिन तेंडुलकरची सुंदर मुलगी सारा तेंडुलकरही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा ही सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. लूक आणि स्टाइलसह साराचे आकर्षक व्यक्तिमत्त्व चाहत्यांना खूप आवडते.

साराला बॉलिवूडमध्ये आपले करिअर करायचे आहे. मीडिया रिपोर्टनुसार सारा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची माहिती समोर आली आहे साराला अभिनयामध्ये खूप आवड असून तिने अभिनयाचे क्लासही केल्याची माहिती समोर आली आहे.

साराने लंडनमधून शिक्षणपूर्ण केले आहे. मात्र तिला बॉलीवूडमध्ये करिअर करायचे आहे. तिच्या या निर्णयामध्ये कायमच तिला सपोर्ट करताना दिसून येतात.

मात्र सचिनने या वृत्ताला नकार दिला आहे. अजूनतरी तिचे शिक्षण सुरु असल्याचे त्याने म्हटले आहे.