
'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री कुब्रा सेतने तिच्या खासगी आयुष्यावर एक पुस्तक लिहिलं होतं. 'ओपन बुक' नावाच्या या पुस्तकात तिने तिच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला होता. 2013 मध्ये एका वन नाईट स्टँडनंतर ती गरोदर राहिली होती.

कुब्रा अंदमानला तिच्या एका मित्रासोबत फिरायला गेली होती. तिथेच दोघांमध्ये झालेल्या 'वन नाईट स्टँड'नंतर कुब्रा प्रेग्नंट होती. त्यावेळी कुब्राने कोणालाच न सांगता गर्भपाताचा निर्णय घेतला होता. त्या संपूर्ण काळात ती मानसिकदृष्ट्या खूप खचली होती.

"मी गर्भपात केला नसला तर त्या बाळाला जन्म देऊन त्याच्यासोबत आयुष्यभर राहण्याची हिंमत माझ्यात तेव्हा नव्हती. या गोष्टींचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. अखेर मी कोणालाच न सांगता एकटीच जाऊन गर्भपात करून आली", असं कुब्राने एका मुलाखतीत सांगितलं.

गर्भपाताच्या पाच ते सहा वर्षांनंतर कुब्राला काही शारीरिक समस्यांचाही सामना करावा लागला होता. "मी एका ट्रॅव्हल शोसाठी शूटिंग करत होते आणि तेव्हा मला अचानक ब्लिडिंग सुरू झालं. मी आजारी पडले होते. माझी खूप चिडचिड होत होती", असं ती पुढे म्हणाली.

मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक काळातून जात असतानाच कुब्राने पुस्तक लिहायचं ठरवलं होतं. या पुस्तकाच्या माध्यमातून तिने तिच्या मनातील सर्व भावना व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे मनातील नकारात्मकता दूर झाली, असं तिने स्पष्ट केली.