CJP Protest : सीजेपी आंदोलनातल्या पोरींचे फोटो सेव्ह करा, काय सांगता…साध्वी प्राची यांचे वादग्रस्त विधान; नेमकं काय म्हणाल्या?

सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या याच तरुणींवर साध्वी प्राची यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. त्या आग्रा येथे आयोजित केलेल्या राजेश्वर मेळा-2026 कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलत होत्या.

| Updated on: Aug 03, 2026 | 8:07 PM
1 / 5
दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर करण्यात आलेल्या आंदोलनामुळे केंद्रातील मोदी सरकारला मोठा हादरा बसला. कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्त्वात झालेल्या या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

2 / 5

दरम्यान, या आंदोलनात जेन झी तरुणाई मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती. तरुणींनी तर सक्रिय सहभाग नोंदवत सकारविरोधातील आपला रोष व्यक्त केला. बॅनरबाजी, पोस्टर्सच्या माध्यमातूनही तरुणींनी मोदी सरकारवर टीका केली होती.

3 / 5

सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या याच तरुणींवर साध्वी प्राची यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. त्या आग्रा येथे आयोजित केलेल्या राजेश्वर मेळा-2026 कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलत होत्या.

4 / 5

यावेळी आंदोलन करण्यात आले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अभद्र भाषेचा वापर करण्यात आला. तरुणींना संस्कार द्यायला हवेत. ज्या तरुणींवर संस्कार कमी असतात त्या अभद्र भाषेचा वापर करतात, असे साध्वी प्राची म्हणाल्या.

5 / 5

तसेच, आंदोलनात अभद्र भाषेचा वापर करणाऱ्या तरुणींचे फोटो मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. यातील एखादी तरुणी भविष्यात त्या जर तुमच्या घरातील सून झाली तर अवघड होईल, असं साध्वी प्राची म्हणाल्या. तसेच शिव्या देणाऱ्या या मुली समाजाला वेगळ्या दिशेने घेऊ जात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us