Sai Tamhankar : मराठी इंडस्ट्रीतली ‘बॅडी’..; सई ताम्हणकरचा बॉस लेडी लूक चर्चेत
मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर पुन्हा एकदा तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत आली आहे. निळा फॉर्मल शर्ट, काळा पेन्सिल स्कर्ट आणि टाय असा तिचा हटके अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असून तिच्या या ग्लॅमरस फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सईने मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. 'दुनियादारी', 'क्लासमेट्स', 'धुरळा' आणि 'मिमी' यांसारख्या चित्रपटांमधून तिने विविध भूमिका साकारल्या आहेत.
अभिनयासोबतच सई ताम्हणकर आपल्या स्टायलिश अंदाजामुळेही नेहमी चर्चेत असते. तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये हलक्या निळ्या रंगाचा फॉर्मल शर्ट आणि काळ्या रंगाचा पेन्सिल स्कर्ट परिधान केली आहे.
सईने या फोटोशूटसाठी निवडलेला निळ्या शर्टचा लूक विशेष लक्ष वेधून घेत आहे. शर्टसोबत परिधान केलेली टाय आणि काळ्या रंगाचा स्कर्ट तिच्या संपूर्ण स्टाइलला वेगळे आकर्षण देत आहे.
या फोटोमध्ये सईची आकर्षक हेअरस्टाइल आणि साधा पण उठावदार मेकअप लक्ष वेधून घेत आहे. मोकळ्या बटा आणि सुंदर मेकअपमुळे तिच्या लूकला अधिक खास रूप मिळाले आहे.
सईने या लूकमध्ये काळ्या रंगाचे ग्लोव्हज आणि मॅचिंग हिल्सची निवड केली आहे. या ॲक्सेसरीजमुळे तिच्या फॉर्मल आउटफिटला अधिक आकर्षक आणि हटके लुक मिळाला आहे. तिच्या या फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेलले असून कंमेंट्सचा वर्षाव होत आहे.