Pataudi Palace Inside Tour: 800 कोटींचा पतौडी पॅलेस! 150 खोल्या अन् बागेतच वडिलांची कबर; सैफ अली खानच्या राजमहालाचे Inside Photos

या महालाची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याच्या बागेतील कुटुंबीयांच्या कबरी. सैफचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांच्यासह त्याच्या आजी-आजोबांच्या कबरीही याच परिसरात आहेत. त्यामुळे या वास्तूशी सैफचं नातं केवळ संपत्तीपुरतं मर्यादित नाही. त्याच्या कुटुंबाचा इतिहास, आठवणी आणि वारसा या महालाशी जोडलेला आहे.

| Updated on: Oct 12, 2026 | 3:12 PM
1 / 8
बॉलिवूडचा नवाब अशी ओळख असलेल्या अभिनेता सैफ अली खान याच्या आलिशान जीवनशैलीची नेहमीच चर्चा होते. त्याच्या अभिनयासोबतच त्याची शाही पार्श्वभूमी आणि कोट्यवधींच्या मालमत्ताही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. यामध्ये सर्वाधिक आकर्षणाचं केंद्र ठरतो तो हरियाणातील पतौडी पॅलेस.

बॉलिवूडचा नवाब अशी ओळख असलेल्या अभिनेता सैफ अली खान याच्या आलिशान जीवनशैलीची नेहमीच चर्चा होते. त्याच्या अभिनयासोबतच त्याची शाही पार्श्वभूमी आणि कोट्यवधींच्या मालमत्ताही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. यामध्ये सर्वाधिक आकर्षणाचं केंद्र ठरतो तो हरियाणातील पतौडी पॅलेस.

2 / 8

तब्बल 800 कोटी रुपये किंमत असल्याचं सांगितलं जाणारं हे आलिशान निवासस्थान सुमारे 10 एकर परिसरात पसरलेलं आहे. या राजमहालात 150 खोल्या, सुंदर बागा, भव्य इंटिरिअर आणि खासगी स्विमिंग पूल आहे.

3 / 8

मात्र, या राजेशाही वास्तूचं सर्वात भावनिक वैशिष्ट्य म्हणजे याच परिसरात सैफचे वडील आणि माजी क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांची कबर आहे. पतौडी पॅलेसला इब्राहिम कोठी या नावानेही ओळखलं जातं. या राजमहालाची रचना पाहिल्यानंतर जुन्या राजेशाही काळाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

4 / 8

पांढऱ्या रंगाची भव्य वास्तू, प्रशस्त खोल्या, आकर्षक फर्निचर, सुंदर कार्पेट्स आणि देखण्या सजावटीमुळे या महालाला एक वेगळाच शाही थाट प्राप्त झाला आहे. या पॅलेसमध्ये सुमारे 150 खोल्या असल्याचं सांगितलं जातं. त्यामध्ये बेडरूम, ड्रॉइंग रूम, ड्रेसिंग रूम आणि बिलियर्ड्ससाठी स्वतंत्र जागांचा समावेश आहे.

5 / 8

महालाच्या बाहेरील परिसरात हिरवीगार झाडं, सुंदर लॉन्स आणि शांत वातावरण अनुभवायला मिळतं. खासगी स्विमिंग पूल हे या वास्तूचं आणखी एक आकर्षण आहे. मुंबईतील धावपळीच्या आयुष्यापासून दूर जाऊन निवांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण सैफ आणि त्याच्या कुटुंबासाठी खास आहे.

6 / 8

पतौडी पॅलेसचा इतिहासही तितकाच रंजक आहे. सैफचे आजोबा इफ्तिखार अली खान पतौडी यांनी या महालाची उभारणी केली. 1935 मध्ये या वास्तूचं बांधकाम पूर्ण झालं. सैफचे वडील मन्सूर अली खान पतौडी हे प्रसिद्ध क्रिकेटपटू होते. त्यांना टायगर पतौडी या नावानेही ओळखलं जायचं.

7 / 8

वडिलांच्या निधनानंतर पतौडी पॅलेस नीमराना हॉटेल्सला भाडेतत्त्वावर देण्यात आला होता. मात्र, सैफला हा कौटुंबिक वारसा पुन्हा स्वतःच्या ताब्यात हवा होता. त्यासाठी त्याने चित्रपटांतून कमावलेल्या पैशांचा वापर करून महालावरील भाडेपट्ट्याची व्यवस्था संपुष्टात आणली. याबाबत सैफने यापूर्वी मुलाखतीत भाष्य केलं होतं.

8 / 8

आज हा महाल केवळ सैफ अली खानच्या संपत्तीचं प्रतीक नाही, तर पतौडी कुटुंबाच्या अनेक पिढ्यांच्या इतिहासाची ओळख आहे. त्याची भव्यता, शाही इंटेरिअर आणि कुटुंबाशी जोडलेल्या आठवणी यामुळे हा राजमहाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us