
पहिल्याच चित्रपटातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. पण आता तो अब्जावधी रुपयाच्या संपत्तीचा मालक आहे. या अभिनेत्याने आपल्या करिअरमध्ये सलग 10 फ्लॉप चित्रपटांचा सामना केला आहे.

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सैफ अली खान आहे. वर्ष 2025 मध्ये भारतात गुगलवर सर्वात जास्त सर्च झालेल्या सेलिब्रिटींमध्ये तो पहिल्या नंबरवर आहे. सैफने 1993 साली परंपरा चित्रपटातून डेब्यु केला.

पण त्याआधीच 1992 साली पडद्यावर आलेल्या बेखुदी चित्रपटातून त्याचा डेब्यु होऊ शकला असता. पण मेकर्सनी नंतर त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. अनेक चित्रपटांबरोबर सैफ अली खानने वेब सीरीजमध्ये सुद्धा काम केलय.

सैफ अली खानला आपल्या तीन दशकाच्या करिअरमध्ये अनेक फ्लॉप चित्रपटांचा सुद्धा सामना करावा लागला. सर्वात वाईट काळ त्याने 2013 ते 2019 मध्ये पाहिला. या सहावर्षात त्याचे सलग 10 चित्रपट फ्लॉप ठरले. त्याचं करिअर पूर्णपणे बॅकफूटवर गेलेलं. गो गोवा गोन, बुलेट राजा, हमशक्ल, हॅप्पी एंडिंग, फँटम, रंगून, शेफ, कालाकांडी, बाजार आणि लाल कप्तान हे चित्रपट फ्लॉप ठरले.

सैफ अली खान श्रीमंतीमध्ये अनेक मोठमोठ्या स्टार्सवर भारी पडतो. त्याची नेटवर्थ 1300 कोटी रुपयाची आहे. यात 800 कोटीची शानदार वडिलोपार्जित हवेली आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये ही हवेली आहे. त्याच्या मुंबईच्या घराची किंमत 70 कोटी आहे.