
सलमान खान याच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पहाटे गोळीबार झाला. सलमान खान याच्या घराबाहेर हा गोळीबार झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय. आता अनेक खुलासे या प्रकरणात झालेत.

लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याने या गोळीबाराची जबाबदारी घेतलीये. आता नुकताच या गोळीबारनंतर सलमान खान याची प्रतिक्रिया पुढे येताना दिसत आहे.

सलमान खान याचा मित्र राहुल कनल याने सांगितले की, भाईजान एकदम ठीक आहेत. सलमान खान याला या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही.

जे होईल ते बघू असेही सलमान खान याने म्हटल्याचे सांगितले जातंय. सकाळपासूनच बरेच लोक हे सलमान खान याला भेटण्यासाठी त्याच्या घरी जात आहेत.

या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. या गोळीबारानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळत आहे. विविध चर्चा या देखील रंगताना दिसत आहेत.