Samantha: आई होण्यापूर्वी समंथाने शेअर केले खास फोटो; पाहून चाहतेही भावूक

Samantha: अभिनेत्री समंथा रुथ प्रभू लवकरच आई होणार आहे. त्यापूर्वी तिने पती राज निदिमोरूसोबत तिने खास पूजा केली. समंथाच्या घरातच हा धार्मिक सोहळा पार पडला असून त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

| Updated on: Nov 18, 2026 | 1:34 PM
1 / 6
Samantha: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. समंथा लवकरच आई होणार असून ती पती आणि प्रसिद्ध दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली आहे. बाळाच्या आगमनापूर्वी समंथा आणि राज यांनी घरी खास धार्मिक पूजा केली. या पूजेचे काही खास फोटो समंथाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Samantha: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. समंथा लवकरच आई होणार असून ती पती आणि प्रसिद्ध दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली आहे. बाळाच्या आगमनापूर्वी समंथा आणि राज यांनी घरी खास धार्मिक पूजा केली. या पूजेचे काही खास फोटो समंथाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2 / 6

यामध्ये दोघंही पारंपरिक वेशभूषेत दिसत असून कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींकडून समंथा आशीर्वाद घेताना दिसतेय. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. समंथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या खास सोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती लाल रंगाच्या सुंदर एम्ब्रॉयडरी केलेल्या सूटमध्ये दिसत आहे. तर राज निदिमोरूने क्रीम रंगाचा कुर्ता आणि पांढरा पायजमा परिधान केला आहे. एका फोटोत दोघंही एकमेकांकडे प्रेमाने पाहताना दिसतात. या फोटोने चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.

3 / 6

इतर काही फोटोंमध्ये समंथा कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींकडून आशीर्वाद घेताना दिसते. तसंच कुटुंबातील सदस्यांसोबत तिने फोटोही काढले आहेत. या खास क्षणांचे फोटो शेअर करताना समंथाने केवळ 'Us' म्हणजेच 'आम्ही' असं कॅप्शन लिहिलं आहे. आई होण्यापूर्वी समंथाने याआधीही एक खास पारंपरिक सोहळा साजरा केला होता. सप्टेंबर महिन्यात समंथा आणि राज यांनी सीमंतम हा पारंपरिक सोहळा केला होता.

4 / 6

यावेळी श्रीविद्या परंपरेशी संबंधित 'कला आवरण (श्री कल्पम)' हा विशेष धार्मिक विधीही पार पडला होता. या विधीचं महत्त्व समंथाने सोशल मीडियावर सांगितलं होतं. प्रत्येक मंत्र आणि अर्पणामागे एक विशिष्ट अर्थ असल्याचं तिने नमूद केलं होतं. गर्भवती महिलेला देवीस्वरूप मानून तिच्यासह बाळाच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्याची या विधीमागील भावना असल्याचंही तिने स्पष्ट केलं होतं.

5 / 6

समंथाने जून 2026 मध्ये तिच्या 'मा इंटी बंगाराम' या चित्रपटाच्या सक्सेस मीटदरम्यान आई होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. यानंतर तिने कामातून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णयही जाहीर केला. सध्याचे प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतर मॅटर्निटी लीव्ह घेणार असल्याचं तिने सांगितलं होतं. त्यानंतर पुन्हा नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्याचं आश्वासनही तिने चाहत्यांना दिलं आहे.

6 / 6

समंथा आणि राज यांची पहिली भेट 'द फॅमिली मॅन 2' या लोकप्रिय वेबसीरिजच्या निमित्ताने झाली. त्यानंतर दोघांनी 'सिटाडेल : हनी बनी' आणि 'मा इंटी बंगाराम' या प्रोजेक्टमध्येही एकत्र काम केलं. 1 डिसेंबर 2025 रोजी दोघांनी कोईम्बतूर इथल्या ईशा फाउंडेशनमध्ये खासगी समारंभात लग्न केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us