
कॉमेडीयन समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लेटेंट' चर्चेत आहे. यंग टॅलेंटला संधी देणाऱ्या या शो मध्ये एका कॉमेडीयनच्या जोक नंतर इंटरनेटवर मोठा गोंधळ सुरु आहे.

समय रैनाच्या शो मध्ये एका महिला कॉमेडियनने अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या डिप्रेशनवर जोक मारला. शो चे जज आणि ऑडियन्सला तो खूप फनी वाटला. पण सोशल मीडिया युजर्सला हे पटलेलं नाहीय.

'इंडियाज गॉट लेटेंट'मध्ये बंटी बॅनर्जी नावाच्या एका महिलेने स्टँडअप परफॉर्मन्स दिला. बंगाल आणि बिहारच्या जोक्सने तिने सुरुवात केली. त्यानंतर तिने सांगितलं की, ती 2 वर्षाच्या मुलीची आई आहे.

बंटी म्हणाली की, मागच्या दोन वर्षांपासून मी नीट झोपलेली नाही. नंतर ती म्हणाली की, दीपिका पादुकोण नुकतीच आई बनली आहे. तिला आता समजलं असेल की, खर डिप्रेशन काय असतं?

बंटीचा हा जोक ऐकून जज पॅनलमधील कॉमेडीय समय रैना, अभिनेता रघुराम, कॉमेडीयन तन्मय भट्ट, न्यूरोलॉजिस्ट डॉ. सिड वॉरियर आणि बलराज सिंह घई अवाक झाले. या जोकवर प्रेक्षक आणि जज दोघे हसू लागले.