
सानिया मिर्झा हिचे वडील इमरान मिर्झा यांनी शमी आणि सानियाच्या लग्नाच्या चर्चांवर खुलासा केला आहे.

सानिया मिर्झा हिचे वडील इमरान यांनी सोशल मीडियावर ज्या काही चर्चा सुरू आहेत त्या बकवास असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

इमरान मिर्झा यांनी सांगितलं की, सानिया आणि मोहम्मद शमी कधी एकमेकांना भेटलेही नाहीत.

सानियाच्या घटस्फोटानंतर सोशल मीडियावर दोघे लग्न करणार किंवा त्यांनी करावं अशा चर्चा होत्या.

सानिया मिर्झाच्या वडिलांनी आता खुलासा केला. पण याआधी एका मुलाखतीमध्ये बोलताना या चर्चा अफवा असल्याचं मोहम्मद शमीने सांगितलं होतं. सानिया मिर्झा ही आता हज यात्रेवर गेली असून सानियाची ही पहिलीच हज यात्रा आहे. जानेवारीमध्ये सानियाने शोएबसोबत घटस्फोट घेतला होता.