पोलिसांनी रात्री अचानक गाडी थांबवली अन् काहीही केलं नसताना..; संकर्षणची पोस्ट चर्चेत

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं नुकताच एक अनुभव सोशल मीडियावर सांगितला आहे. इन्स्टाग्रामवर त्याने पोलिसांसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. अचानक त्यांनी रात्री संकर्षणची गाडी थांबवली होती. ते कशासाठी, वाचा..

| Updated on: Mar 15, 2026 | 9:31 AM
1 / 5
संकर्षण कऱ्हाडे हा मराठी नाटक आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर परदेशातही संकर्षणच्या नाटकाचे अनेक प्रयोग होत असतात. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या या हरहुन्नरी कलाकाराने नुकताच एक किस्सा सांगितला.

संकर्षण कऱ्हाडे हा मराठी नाटक आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर परदेशातही संकर्षणच्या नाटकाचे अनेक प्रयोग होत असतात. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या या हरहुन्नरी कलाकाराने नुकताच एक किस्सा सांगितला.

2 / 5

इन्स्टाग्रामवर पोलिसांसोबतचे काही फोटो पोस्ट करत संकर्षणने त्याच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला आहे. रात्री अचानक त्याची गाडी पोलिसांनी थांबवली होती. काहीच केलं नसताना त्यांनी आपली गाडी का थांबवली, या विचाराने तो घाबरला होता.

3 / 5

परंतु पोलिसांनाही संकर्षणला पाहिल्यावर त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नव्हता. संकर्षणसोबत त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या आणि त्याच्यासोबत फोटोसुद्धा क्लिक केला.

4 / 5

'रात्री अचानक आपली गाडी थांबवली जाते.. काहीही केलं नसतांना उगीच मनात भिती वाटते आणि पोलीस मामा येऊन म्हणतात "साहेब एक फोटो काढू..” आणि मग खूप गप्पा. खरं सांगू, मला 'वर्दीतल्या सेलिब्रिटिंसोबत' फोटो काढायला फार आवडतं,' असं कॅप्शन देत संकर्षणने हे फोटो पोस्ट केले आहेत.

5 / 5

त्याच्या या पोस्टवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'मस्तच! आवडत्या अभिनेत्याची गाडी थांबवून फोटो काढायला मिळणं म्हणजे खरं सुख,' असं एकाने लिहिलं. तर 'वर्दीतले सेलिब्रिटी' असं दुसऱ्याने म्हटलंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us