
सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो, व्हिडीओ ती नेहमी चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सारा नेहमी तिचे व्हॅकेशनचे फोटो शेअर करताना दिसते. साराने अशाच एका तिच्या व्हेकेशनचे काही बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे पाहून चाहत्यांनी भरभरून कमेंटस् केल्या आहेत.

या फोटोंमध्ये सारा अतिशय सुंदर दिसत आहे, आणि तिच्या खास अदांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तसेही तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात.

साराने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती समुद्र किनारी वेळ घालवताना दिसत आहे. तिने यावेळी हिरव्या रंगाचा सुंदर ड्रेस घातला आहे . तिच्या साध्या पण स्टायलिश लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावरचं तेज आणि गोड हास्य चाहत्यांच्या मनाला भिडत आहे.

यातील एका फोटोमध्ये सारा स्ट्रॉबेरी खाताना दिसत आहे

तर दुसऱ्या फोटोमध्ये ती समुद्राच्या लाटांसमोर टोपी घालून शांतपणे बसलेली दिसत आहे.

साराने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. 'संपूर्ण दिवस आनंदी करण्यासाठी हे फोटो पुरेसे आहेत,' अशी एका चाहत्याने या फोटोंवर कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने लिहिले आहे, 'साराची प्रत्येक अदा अनोखी आणि मनमोहक असते.' तिच्या साधेपणामुळे आणि मोहक अदांमुळे सारा नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनते.

सारा तेंडुलकरचे इंस्टाग्रामवर तिचे 7.4 मिलियन फॉलोवर्स आहेत. आणि तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांकडून लाखोंच्या संख्येने लाईक्स आणि कमेंट्स येतात. सध्या व्हायरल झालेल्या या फोटोंनाही तिच्या चाहत्यांनी खूप प्रेम दिलं आहे.

समुद्र किनाऱ्यावरून शेअर केलेले तिचे हे फोटोही नेहमीच्या फोटोंप्रमाणे व्हायरल झालेले आहेत.