
भारताचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर ही अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते.

सारा तेंडुलकर तिच्या सौंदर्यामुळे तर चर्चेत असतेच पण आता ती तिने मिळवलेल्या यशाबद्दल चर्चेत आहे.

अलीकडे साराने असे काही केले ज्यामुळे सचिन तेंडुलकरलाही अभिमान वाटतोय. सचिन तेंडुलकरने तिचे कौतूक केले आहे.

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने हिने पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधून तिने ही पदवी मिळवली आहे.

राने पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर तिचे वडील सचिन तेंडुलकर खूपच भावूक दिसले. आपल्या मुलीच्या या विशेष कामगिरीबद्दल त्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला.

सचिन तेंडुलकरने मुलगी सारा तेंडुलकरबाबत सोशल मीडियावर पोस्ट केलीये. साराला मास्टरमध्ये किती मार्क्स मिळाले ते कळू शकलेले नाही. पण सचिनच्या म्हणण्यानुसार, साराने तिची मास्टर डिग्री डिस्टिंक्शनसह मिळवली आहे.

आपल्या ट्विटमध्ये सचिन तेंडुलकरने पुढे लिहिले की, आम्हाला माहित आहे की तू तुझी सर्व स्वप्ने पूर्ण करणार आहेस.