PHOTO | कळसुबाई शिखरावर तिरंगी झेंड्याद्वारे साताऱ्याच्या तरुणांकडून शहीद जवानांना अनोखी आदरांजली
श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपमधील सदस्यांनी कळसुबाई शिखरावर 321 फूट लांबीच्या तिरंग्यातून शहीद जवानांना अनोखी आदरांजली वाहिली. Tribute to martyr
1 / 5

सातारा जिल्ह्यातील लोणंदच्या श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या सदस्यांनी देशासाठी शहीद होणाऱ्या जवानांना आदरांजली देण्यासाठी थेट महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कळसुबाईवर जाण्याचा निर्णय घेतला.
2 / 5

श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपमधील सदस्यांनी कळसुबाई शिखरावर 321 फूट लांबीच्या तिरंग्यातून महाराष्ट्राचा नकाशा तयार करून शहीद जवानांना अनोखी आदरांजली वाहिली.
3 / 5

लोणंदच्या श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्यावतीने महाराष्ट्रातील सर्वात उंच 1646 मीटर उंचीच्या कळसुबाई शिखर मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते.
4 / 5

श्री भैरवनाथ डोंगर मॉर्निंग वॉक ग्रुपचे साठ सदस्य कळसुबाई शिखरावर दाखल झाले होते.
5 / 5

श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या सदस्यांमध्ये 5 वर्षाच्या मुलांपासून 65 वर्षापर्यंतच्या वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते.
Follow Us