SIM Lock : सिम लॉक म्हणजे काय, फोनसाठी का महत्वाचं हे फीचर ?

आपला मोबाईल क्रमांक बँकिंग, यूपीआय (UPI) आणि सोशल मीडियाशी जोडलेला असल्याने, त्याची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. 'सिम लॉक' (SIM Lock) या वैशिष्ट्याचा वापर करून तुम्ही सिमचा गैरवापर होण्याचा धोका कमी करू शकता.

| Updated on: Sep 17, 2026 | 5:39 PM
1 / 6
आजच्या काळात मोबाईल क्रमांक केवळ कॉल आणि मेसेजपुरता मर्यादित नाही; तर तो बँक खातं, यूपीआय (UPI), सोशल मीडिया आणि विविध महत्त्वाच्या ऑनलाइन सेवांशी जोडलेला असतो. त्यामुळे, जर तुमचं सिम कार्ड चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागलं किंवा कोणी तुमच्या क्रमांकाचा गैरवापर करण्यास सुरुवात केली, तर मोठं नुकसान होऊ शकतं. अशा परिस्थितीत, 'सिम लॉक' (SIM lock) सुरू ठेवल्याने जास्तीची सुरक्षा मिळू शकते.

2 / 6

मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाचं ते म्हणजे सिम लॉक आणि स्क्रीन लॉक या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्क्रीन लॉकमुळे आपला संपूर्ण फोन सुरक्षित राहतो, तर सिम लॉक हे विशेषतः सिम कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी असतं. त्यामुळे, या दोन्ही सुरक्षा फीचर्सचा वापर करणं उत्तम.

3 / 6

कसं सुरू कराल SIM lock ? : जर तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल, तर साधारणपणे 'सेटिंग्ज' (Settings) मध्ये जाऊन 'सुरक्षा' (Security) किंवा 'गोपनीयता' (Privacy) या पर्यायाअंतर्गत तुम्हाला 'सिम लॉक' (SIM Lock) किंवा 'सिम कार्ड लॉक' (SIM Card Lock) हा ऑप्शन मिळू शकेल. फोन बनवणाऱ्या कंपनीनुसार या पर्यायाचे नाव आणि जागा, त्याचं स्थान बदलू शकतं.

4 / 6

तुम्ही जर आयफोन वापरत असाल तर तिथे Settings > Cellular/Mobile Service > SIM PIN या मार्गाचा वापर करून तुम्ही सिम लॉक सुरू करू शकता. पहिल्यांदाच सिम लॉक (SIM lock)सक्रिय (ॲक्टिव्ह) करताना, तुम्हाला तुमच्या सिमचा सध्याचा 'डिफॉल्ट' (मूळ) पिन क्रमांक टाकावा लागू शकतो. हा पिन क्रमांक मोबाइल ऑपरेटरनुसार वेगवेगळा असू शकतो.

5 / 6

तुमचा SIM PIN विसरू नका: एकदा का सिम लॉक सक्रिय झालं की, तो पिन लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. चुकीचा पिन अनेकदा टाकल्यास सिम लॉक होऊ शकते आणि ते अनलॉक करण्यासाठी पीयूके (PUK) कोडची आवश्यकता लागते. त्यामुळे, योग्य पिन माहीत नसताना तो वारंवार टाकणे टाळा.

6 / 6

या गोष्टी विसरू नका : सिम लॉकमुळे सुरक्षेचा एक अतिरिक्त स्तर मिळत असला तरी, ते काही सायबर फसवणुकीपासून संपूर्ण संरक्षण नव्हे. त्यामुळे सुरक्षेची काळजी घ्या. कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत ओटीपी शेअर करू नका.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us