Senior Citizen Savings Scheme : रिटायरमेंटनंतर ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 61,500 रुपये; जाणून घ्या या ‘खास’ सरकारी योजनेची माहिती

निवृत्तीनंतर घर- खर्च औषधोपचार आणि इतर गरजांसाठी पैशांचं नियोजन करणे महत्त्वाचे ठरतं. अशावेळी हातात असलेली मोठी रक्कम कुठे गुंतवावी? जेणेकरून त्यावर नियमित उत्पन्न मिळेल आणि पैशांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देता येईल. असा प्रश्न अनेक ज्येष्ठ नागरिकांना पडतो. त्यासाठी ही सरकारी योजना तुमच्यासाठी उत्तम आहे. जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Oct 28, 2026 | 6:09 PM
1 / 6
नोकरीत असताना दर महिन्याला पगार खात्यात जमा होतो. पण निवृत्तीनंतर पगार बंद झाला की घर- खर्च औषधोपचार आणि इतर गरजांसाठी पैशांचं नियोजन करणे महत्त्वाचे ठरतं. अशावेळी हातात असलेली मोठी रक्कम कुठे गुंतवावी? जेणेकरून त्यावर नियमित उत्पन्न मिळेल आणि पैशांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देता येईल. असा प्रश्न अनेक ज्येष्ठ नागरिकांना पडतो. अशा गुंतवणुकीसाठी केंद्र सरकारची ज्येष्ठ नागरिक बचत योजना हा एक पर्याय आहे Senior Citizen Savings Scheme

नोकरीत असताना दर महिन्याला पगार खात्यात जमा होतो. पण निवृत्तीनंतर पगार बंद झाला की घर- खर्च औषधोपचार आणि इतर गरजांसाठी पैशांचं नियोजन करणे महत्त्वाचे ठरतं. अशावेळी हातात असलेली मोठी रक्कम कुठे गुंतवावी? जेणेकरून त्यावर नियमित उत्पन्न मिळेल आणि पैशांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देता येईल. असा प्रश्न अनेक ज्येष्ठ नागरिकांना पडतो. अशा गुंतवणुकीसाठी केंद्र सरकारची ज्येष्ठ नागरिक बचत योजना हा एक पर्याय आहे Senior Citizen Savings Scheme

2 / 6

ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या तिमाही योजनेवर वार्षिक 8.2% व्याजदर लागू आहे या दराने 30 लाख रुपये गुंतवल्यास वर्षाला 2 लाख 46 हजार रुपये व्याज मिळू शकतो. हे व्याजदर 3 महिन्यांनी दिलं जातं म्हणजेच प्रत्येक ती महिला 61 हजार 500 रुपये मिळू शकतात. महिन्याच्या हिशोबाने ही रक्कम सरासरी 20,500 रुपये होते. मात्र पैसे दर महिन्याला मिळत नाहीत व्याजाचे प्रत्यक्ष भोगतात तिमाही पद्धतीने होतं.

3 / 6

या योजनेत मिळणाऱ्या व्याज तुम्ही किती रक्कम गुंतवता यावर अवलंबून असतं : 5 लाख रुपये गुंतवल्यास दर तिमाही 10250 रुपये; 10 लाख रुपये गुंतवल्यास तर तिमाही 20500 रुपये; 15 लाख रुपये गुंतवल्यास दर तिमाही 30750 रुपये; 20 लाख रुपये गुंतवल्यास दर तिमाही 41 हजार रुपये; 25 लाख रुपये गुंतवल्यास तिमाही 51 हजार 250 रुपये ; 30 लाख रुपये गुंतवल्यास तिमाही 61 हजार पाचशे रुपये

4 / 6

सामान्यतः 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना या योजनेत खाते उघडता येते काही अटीनुसार 55 ते 60 वयोगटातील निवृत्त व्यक्ती नाही पात्रता मिळू शकते योजनेचा कालावधी पाच वर्षांचा असून नियमानुसार तो आणखी तीन वर्षांसाठी वाढवता येतो एका व्यक्तीच्या खात्यामध्ये एकूण गुंतवणुकीची कमाल मर्यादा 30 लाख रुपये आहे

5 / 6

या योजनेचा व्याज नियमित मिळत असलं तरी ते कर पात्र असू शकतं त्यामुळे प्रत्यक्ष हातात येणारी रक्कम कराच्या परिस्थितीनुसार कमी होऊ शकते. तसेच मुदतीपूर्वी पैसे काढण्यासाठी काही अटी आणि दंड लागू होऊ शकतात.

6 / 6

त्यामुळे निवृत्तीनंतरची संपूर्ण बचत एकाच योजनेत गुंतवणे आधी आपत्कालीन खर्चासाठी काही रक्कम बाजूला ठेवणं महत्त्वाचं आहे योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा सहभागी बँकेत सध्याचे नियम पात्रता आणि व्याजदर तपासून घ्या

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us