
ऐश्वर्या राय आणि करिष्मा कपूर या बॉलिवूडमधील दोन मोठ्या अभिनेत्री आहेत. या अभिनेत्रीच्या मागे बॅकग्राऊंड डान्सर म्हणून नाचणारा मुलगा आज एक मोठा स्टार बनलाय.

मेहनतीच्या बळावर हा अभिनेता इथवर पोहोचलाय. चित्रपटात बॅकग्राऊंड डान्सर, मॉडलिंग करुन त्याने आज ही मजल गाठली आहे. स्टेजवर करिष्मा कपूरच्या मागे हा मुलगा नाचायचा.

अभिनेता म्हणून डेब्यु करण्याआधी मनोरंजन क्षेत्रात त्याने पाऊल ठेवलं होतं. सुरुवातीला त्याला ऐश्वर्या राय-करिष्मा कपूर यांच्या चित्रपटात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम कराव लागलं.

1999 साली ऐश्वर्या रायचा ताल चित्रपट आला. त्यात अक्षय खन्ना, अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात तो बॅकग्राऊंड डान्सर होता.

1999 सालीच करिष्मा कपूरचा 'दिल तो पागल हैं' चित्रपट आला. या चित्रपटातही तो मुलगा बॅकग्राऊंड डान्सर म्हणून दिसला होता.

आज हा मुलगा इंडस्ट्रीतला मोठा स्टार आहे. त्याचे चित्रपट कोट्यवधीची उलाढाल करतात. स्वत: हा मुलगा अब्जाधीश आहे. त्यावेळी ऐश्वर्या राय-करिष्मा कपूरला हा मुलगा पुढे जाऊन इतका मोठा स्टार होईल असं वाटलही नसेल.

अलीकडे आमिर खानची एक्स वाईफ किरण रावने त्याच्यासोबत चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली.

बॉलिवूडच्या एका मोठ्या अभिनेत्रीसोबत त्याच अफेअर गाजलं. आजही प्रेक्षक दोघांच्या रिलेशनशिपबद्दल चवीने चर्चा करतात. करिना कपूरसोबत त्याने काम केलय.

इश्क विश्क चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यु केला. किरण रावला दोघांना घेऊन जब वी मेट 2 चित्रपट बनवायचा आहे.

बॅकग्राऊंड डान्सर, मॉडेल ते यशस्वी अभिनेता असा प्रवास करणाऱ्या या अभिनेत्याच नाव आहे शाहिद कपूर. शाहिदने विवाह, कमीने, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, कबीर सिंह सारखे हिट चित्रपट दिले आहेत.