शहनाज गिल – राघव जुयाल यांच्यात कोण सर्वाधिक श्रीमंत? दोघांची नेटवर्थ किती?
अभिनेत्री शहनाज गिल सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. शहनाजचं नाव डान्सर, कोरिओफर आणि अभिनेचा राघव जुयालशी जोडलं जात आहे. या दोघांकडे किती संपत्ती आहे, ते जाणून घ्या..

'बिग बॉस' फेम शहनाज गिल आणि राघव जुयाल ही जोडी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकतंच राघवच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बर्थडे सेलिब्रेशननंतर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले. शहनाज आणि राघवच्या जोडीबद्दल चाहते खूप खुश आहेत.

शहनाज गिलला 'बिग बॉस 13'मुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने टीव्ही, चित्रपट आणि म्युझिक व्हिडीओंच्या माध्यमातून वेगळी ओळख बनवली. शहनाजने तिच्या लोकप्रियतेच्या आधारावर इंडस्ट्रीत स्थान मिळवलं आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, शहनाजची एकूण संपत्ती 30 कोटी रुपयांच्या घरात आहे.

राघव जुयाल हा प्रसिद्ध डान्सर, कोरिओग्राफर, सूत्रसंचालक आणि अभिनेता आहे. डान्स शोजमध्ये भाग घेऊन त्याने इंडस्ट्रीत लोकप्रियता मिळवली. त्यानंतर विविध शोजचं तो सूत्रसंचालन करू लागला. राघवने अभिनयक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. 'मनी मिंट'ने दिलेल्या वृत्तानुसार, राघव जुयालची एकूण संपत्ती जवळपास 33 कोटी रुपये इतकी आहे.

याआधी 2022 मध्ये 'किसी का भाई, किसी की जान' या चित्रपटाच्या वेळीही शहनाज आणि राघवच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतरही दोघांना विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेलं. मात्र शहनाज आणि राघव यांनी रिलेशनशिपच्या चर्चांना नाकारलं होतं. आता पुन्हा एकदा या दोघांच्या नात्याची चर्चा होऊ लागली आहे.

बर्थडे पार्टीनंतर पापाराझी आणि चाहत्यांच्या गर्दीतून वाट काढताना राघव शहनाजची मदत करताना, तिला सांभाळताना दिसला होता. इतकंच नव्हे तर त्यानंतर दोघंही एकाच कारमधून जाताना दिसले होते. या चर्चांवर शहनाज किंवा राघवने अद्याप प्रतिक्रिया दिली नाही.