पुणे हादरलं कोर्टाबाहेर टोळक्याकडून एकावर गोळीबार, गोळ्या झाडल्या अन्.., वकिलाने संगितला थरारक अनुभव
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर कोर्टाच्या गेट क्रमांक 4 बाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे.

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर कोर्टाच्या गेट क्रमांक 4 बाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. सहा जणांच्या टोळक्याकडून एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेनंतर गोळीबारातील दोन पिस्टल फेकत आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनं पुणे हादरलं आहे. दरम्यान गोळीबारानंतर आरोपींनी संबंधित व्यक्तीवर कोयत्याने देखील हल्ला केला आहे. गोळीबार करताना नेम चुकल्याने आरोपींनी संबंधित व्यक्तीवर कोयत्याने हल्ला केला आहे. या घटनेमध्ये संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मंदार किवळे असं या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
समोर आलेल्या माहितीप्रमाणे मृत्यू झालेली व्यक्ती ही एका हत्या प्रकरणातील साक्षीदार होती. दरम्यान भर दिवसा आणि ते पण कोर्ट परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे, सहा जणांच्या टोळक्याकडून गोळीबार करण्यात आला, गोळीबारानंतर कोयत्याने देखील हल्ला करण्यात आला. त्यामुळे आरोपींना कायद्याचा धाक उरलाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. घटनास्थळी नेमकं काय घडलं? याचा थरारक अनुभव वकिलाने सांगितला आहे.
नेमकं काय घडलं?
शिवाजीनगर कोर्टाच्या गेट क्रमांक 4 बाहेर ही घटना घडली आहे. आरोपींनी गोळीबार केला. गोळीबारानंतर ज्याच्यावर गोळीबार झाला तो बचाव बचाव असं ओरडत होता. तो गेटबाहेर आला. रक्तबंबाळ अवस्थेमध्ये होता. मी ही घटना प्रत्यक्ष पाहिली नाही, परंतु यामुळे आता वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया यावर एका वकिलाकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यापूर्वी देखील पुण्यात अनेक गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान या प्रकरणाता आता पोलिसांकडून तपासाला सुरुवात झाली आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. हल्ल्यानंतर आरोपींनी दुचाकीवरून पळ काढला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली.
