Shikhar Dhawan : प्रायव्हेट बार, बाल्कनीतून नयनरम्य नजारा अन् … दुसऱ्या बायकोसोबत इतक्या आलिशान घरात राहतोय शिखर धवन, Inside फोटो व्हायरल

Shikhar Dhawan Lavish Home: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. शिखर याने दुसरं लग्न करत आलिशात घरात पुन्हा नवा संसार थाटला आहे. त्याच्या घरात प्रयव्हेट बार पासून सुंदर बाल्कनीतील व्ह्यू दिसतो. सध्या त्याच्या घराचे फोटो व्हायरल होत आहेत.

| Updated on: Nov 17, 2026 | 8:53 AM
1 / 7
  भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवन याने सोफी शाइन हिच्यासोबत दुसरा संसार थाटला आहे. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोफी हिने घरातील काही खास जागा दाखवल्या आहेत. घराच्या एन्ट्रीवरच मंदिर आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवन याने सोफी शाइन हिच्यासोबत दुसरा संसार थाटला आहे. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोफी हिने घरातील काही खास जागा दाखवल्या आहेत. घराच्या एन्ट्रीवरच मंदिर आहे.

2 / 7

शिखर याच्या घरातील लिव्हिंग रूम फार मोठा आहे. जेथे लाल रंगाचा पूल टेबल देखील ठेवण्यात आला आहे. तर घरातील हा भाग उत्तम प्रकारे सजवण्यात आला आहे.

3 / 7

लिव्हिंग रूममध्येच शिखर धवन याने क्रिकेटविश्वातील आठवणी जपून ठेवल्या आहेत. भिंतींवर शिखर याचे फोटो लावण्यात आले आहे, तर त्याने जिंकलेल्या अनेक पुरस्कार देखील येथे ठेवण्यात आले आहेत.

4 / 7

लिव्हिंग रुममध्ये सुंदर सोफे देखील ठेवण्यात आले आहे. शिखर आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीने घरातील प्रत्येक कोपरा प्रेमाने सजवलेला आहे. त्यांचं घर फार सुंदर आहे.

5 / 7

शिखर धवन याने आलिशान घरात एक खास बार सेक्शन देखील तयार केलं आहे. यासाठी गुलाबी रंगाचा वापर करण्यात आला आगे. तर लाईट ब्लू रंगामुळे तो भाग उठून दिसत आहे. रंगांमुळे प्रायव्हेट बारला एक वेगळा लूक आला आहे.

6 / 7

घरातील डायनिंग एरिया देखील खास आहे. उत्तम प्रकारे डायनिंग एरिया देखील सजवण्यात आली आहे. येथील फर्निचर आणि भिंतींवर लागलेल्या पेंटिंग्स घराची शोभा वाढवत आहेत.

7 / 7

शिखर धवन याच्या घराताली बाल्कनी देखील खास आहे. येथे आरामदायक सोफे ठेवण्यात आले आहेत. बाल्कनीतून नयनरम्य नजारा दिसत आहे. शिखर आणि त्याच्या बायकोचं हे घर प्रचंड सुंदर असून ते गुरुग्राम येथे आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us