
वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामना होणार आहे. क्रिकेट जगत हा सामना पाहण्यासाठी उत्सुक असून बाबर आझम पाकिस्तान संघाचं नेतृत्त्व करत आहे. तर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे आहे.

आजचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी दोन वाजता पार पडणार आहे. वर्ल्ड कपमधील हा सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणी असते. पाकिस्तान आणि भारतीय संघाने आतापर्यंत दोन्ही सामने जिंकले आहेत.

भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा तर दुसऱ्या सामन्यामध्ये अफगाणिस्तान संघावर विजय मिळवला आहे. तर पाकिस्तान संघाने पहिल्या सामन्यामध्ये नेदरलंँड तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंका संघाचा पराभव केलाय. भारत आणि पाकिस्तान संघामधील जुनी राईवलरी असून नेहमी सामना रोमहर्षक झालेला पाहायला मिळतो.

दोन्ही संघातील आजी-माजी खेळाडूंचे अनेक किस्से पाहायला मिळतात. यामधील एक म्हणजे पाकिस्तानचा स्टार खेळाडू मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता. ही अभिनेत्री कोण नाही तर सोनाली बेंद्रे आहे

एका सामन्यावेळी पाकिस्तानच्या खेळाडूची आणि सोनालीची भेट झाली होती. मात्र दोघांचीही ती भेट पहिली आणि अखेरची ठरली होती. पाकिस्तानचा तो खेळाडू माजी गोलंदाज शोएब अख्तर आहे. एकदा शोएब अख्तर म्हणाला होता की तो सोनाली बेंद्रेला प्रपोज करणार आहे आणि जर अभिनेत्रीने प्रपोझ नाही स्वीकारला नाही तिला जबरदस्तीने घेऊन जाईल.