फक्त व्ह्यूजसाठी चिमुकल्याचाही जीव धोक्यात..; प्रसिद्ध अभिनेत्याचा बहिणीला हायवेवर इफ्तार करणं पडलं महागात

या वादावर अद्याप सबाने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. सबा इब्राहिम आणि खालिद नियाज यांनी 2022 मध्ये लग्न केलं. हे दोघं बऱ्याच काळापासून युट्यूब व्लॉगद्वारे त्यांच्या आयुष्यातील अपडेट्स शेअर करत असतात.

| Updated on: Mar 16, 2026 | 4:04 PM
1 / 5
टीव्ही अभिनेता शोएब इब्राहिमची बहीण आणि दीपिका कक्करची नणंद सबा इब्राहिम ही प्रसिद्ध युट्यूबर आहे. सबा तिच्या युट्यूब चॅनलवर विविध व्हिडीओ आणि व्लॉग पोस्ट करत असते. नुकत्याच एका व्लॉगमध्ये सबा आणि तिचे कुटुंबीय हायवेवर एका बाजूला बसून इफ्तार करताना दिसत आहेत. यावरून अनेकांनी तिला सुनावलं आहे.

2 / 5
सबा लोकप्रिय व्लॉगर असून युट्यूबवर ती तिच्या आयुष्यातील छोटे-मोठे अपडेट्स शेअर करत असते. नुकत्याच एका व्लॉगमध्ये तिने मुंबई ते मौदाहा इथल्या तिच्या पतीच्या घरी जाण्याचा प्रवास दाखवला. ईद साजरी करण्यासाठी सबा तिथे जात होती.

3 / 5
या प्रवासादरम्यान सबा, तिचा पती खालिद नियाज ऊर्फ सनी हे सूर्यास्ताच्या वेळी हायवेवर त्यांची कार थांबवतात. रमजानमध्ये सूर्यास्ताच्या वेळी रोजा सोडला जातो. याला इफ्तार म्हणतात. या इफ्तारसाठी सबा आणि तिचे कुटुंबीय हायवेच्या कडेला एक कापड अंथरून तिथेच इफ्तारसाठी बसतात.

4 / 5
या व्हिडीओमध्ये हायवेवर त्यांच्या जवळून अनेक वाहने वेगाने जात असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. सबासोबत तिचा लहान मुलगासुद्धा होता. अशा पद्धतीने हायवेवर जेवायला बसणं कितपत योग्य आहे, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

5 / 5
जर काही अपघात झाला तर त्याला कोण जबाबदार असेल? युट्यूबवर व्लॉग  पोस्ट करण्यासाठी कोणत्याही थराला जाणं चुकीचं आहे, असं एकाने लिहिलं. तर 'हे फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी केलेला स्टंट आहे', असं दुसऱ्याने म्हटलंय. 'ते गाडीत बसूनही जेवू शकले असते', असं आणखी एकाने लिहिलं आहे.

Follow Us