26 वर्षांनी मोठ्या सिनेमॅटोग्राफरशी लग्न, अवघ्या 17 व्या वर्षी निधन; मृत्यूचं गूढ आजही कायम

वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर काही दिवसांतच या अभिनेत्रीचं निधन झालं होतं. राहत्या घरी अभिनेत्री मृतावस्थेत आढळली होती. तिच्या निधनामागचं नेमकं कारण आजवर अस्पष्ट आहे.

| Updated on: May 14, 2026 | 2:04 PM
1 / 5
सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री होऊन गेल्या आहेत, ज्यांनी त्यांच्या दमदार कामाच्या जोरावर अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवली. अशाच एका अभिनेत्रीचं होतं शोभा. 1970 च्या दशकात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत मोठ्या अभिनेत्रींपैकी ती एक होती.

2 / 5
शोभाने लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. शोभाची आईसुद्धा अभिनेत्री होती. वयाच्या चौथ्या वर्षी तिने अभिनयात पदार्पण केलं होतं. नायिका म्हणून तिचा पहिला चित्रपट 1978 मध्ये प्रदर्शित झाला होता. 'उथराडा रात्री' असं या मल्याळम चित्रपटाचं नाव होतं.

3 / 5
सेटवर काम करत असताना शोभा तिच्यापेक्षा 26 वर्षांनी मोठ्या आणि आधीच विवाहित असलेल्या सिनेमॅटोग्राफर बालू महेंद्रच्या प्रेमात पडली. या प्रेमासाठी तिने कुटुंबाच्या इच्छेविरोधात जाऊन 1978 मध्ये त्याच्याशी लग्नसुद्धा केलं. याचा परिणाम शोभाच्या कौटुंबिक नात्यांवर आणि चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीवर झाला.

4 / 5
शोभाने रजनीकांत आणि कमल हासन यांसारख्या दिग्गजांसोबत काम करून तमिळ चित्रपटसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. तिने शंभरहून अधिक प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी शोभाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

5 / 5
राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर काही काळातच शोभा मद्रासमधील तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळली होती. वयाच्या 17 व्या वर्षी तिचा मृत्यू झाला होता. मात्र त्यामागचं कारण आजही अज्ञात आहे. शोभाच्या घरात कोणती चिठ्ठीही आढळली नव्हती. मात्र शोभाच्या आईने तिच्या मृत्यूसाठी पती बालू महेंद्रला जबाबदार धरल होतं.

Follow Us