आधी फुस्स फुस्स आवाज आला… दरवाजा उघडताच टॉयलेटमध्ये नागाचा डेरा, बघातच काळजात धस्स

नाग दिसला... नागाला रेस्क्यू केलं... नाग घरात आढळला... हे असं ऐकलं तरी काळजाचा धस्स होतं... आता तर रात्री दरवाजा उघडताच टॉयलेटमध्ये नागाचा डेरा डोळ्यासमोर दिसल्याने खळबळ उडाली. सध्या घटनेचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत.

| Updated on: Nov 03, 2026 | 1:49 PM
1 / 5
अकोल्यात चक्क घरातील कमोडमध्ये काळ्या नागाने ठाण मांडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्री दरवाजा उघडल्यानंतर समोर नागाचा डोरा पाहायला मिळाला.  ज्यामुळे घरात एकच खळबळ माजली.

अकोल्यात चक्क घरातील कमोडमध्ये काळ्या नागाने ठाण मांडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्री दरवाजा उघडल्यानंतर समोर नागाचा डोरा पाहायला मिळाला. ज्यामुळे घरात एकच खळबळ माजली.

2 / 5

रात्री टॉयलेटमध्ये नाग आढळल्याने कुटुंबियामध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं. अशात नागाला पाहण्यासाठी शेजाऱ्यांनी देखील गर्दी केली. त्यानंतर कुटुंबियांनी सर्पमित्रांना कळवल्यानंतर नागाला रेस्क्यू करण्यात आलं.

3 / 5

समोर आलेल्या माहितीनुसार, अकोल्यातील सुधीर कॉलनी परिसरातील कांडेकर यांच्या घरात रात्री दहाच्या सुमारास हा विषारी नाग कमोडमध्ये आढळून आला. सुदैवाने वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.

4 / 5

नागाला रेस्क्यू करण्यासाठी सर्पमित्रांना बोलवण्यात आलं, तेव्हा त्यांनी या प्रकरणी मोठा खुलासा केला. दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी आणि थंड जागेच्या शोधात सरपटणारे वन्यजीव आता मानवी वस्तीकडे धाव घेत असल्याचं सर्पमित्रांचं म्हणणं आहे.

5 / 5

नाग कमोडमध्ये आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून आगामी काळात सर्पमित्र आणि वनविभागासमोर वन्यजीवांच्या रेस्क्यूचं मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. यावेळी सर्पमित्र आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्यासाठी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us