Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरचा 11.60 लाखांचा मराठमोळा थाट! साडी 1 लाख, ब्लाउज 35 हजार, चपलांची अन् कानातल्यांची किंमत तर थक्क करणारी
Shraddha Kapoor : अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या 'ईठा' सिनेमामुळे चर्चेत आली आहे. 4 डिसेंबर रोजी 'ईठा' सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. पण सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच सर्वत्र चर्चा रंगल्या आहे. सध्या सर्वत्र श्रद्धाच्या लूकची चर्चा रंगली आहे. या लूकसाठी अभिनेत्रीने तब्बल 11.60 लाख रुपये मोजले आहे. तर जाणून घ्या कोणती वस्तू किती रुपयांची आहे.

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर नेहमीच आपल्या साधेपणाने आणि आकर्षक स्टाइलमुळे चाहत्यांची मनं जिंकत असते. सध्या तिच्या एका पारंपारिक मराठमोळ्या लूकची आणि त्यातील दागिने व कपड्यांच्या किमतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
हिरव्या आणि लाल रंगाच्या पारंपारिक साडीतील या लूकची एकूण अंदाजे किंमत 11 लाख 60 हजार रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे. फॅशन ब्रेकडाउननुसार, श्रद्धाच्या या संपूर्ण साजशृंगारात दागिन्यांचा वाटा सर्वाधिक आहे.
तिच्या गळ्यातील पारंपारिक चोकर नेकलेसची अंदाजे किंमत तब्बल 5 लाख 50 हजार रुपये इतकी आहे. याशिवाय, कानातील झुमक्यांची किंमत 1 लाख 80 हजार रुपये, कमरेला घातलेल्या कंबरपट्ट्याची किंमत 1 लाख 20 हजार रुपये आहे. अभिनेत्रीने घातलेले झुमके प्रचंड सुंदर आहेत.
हातातील बांगड्यांच्या किंमत 65 हजार रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे. दागिन्यांबरोबरच तिच्या पेहरावाची आणि चपलांची किंमतही लक्षवेधी आहे. तिने नेसलेल्या पारंपारिक साडीची अंदाजे किंमत 1 लाख 25 हजार रुपये, तर नक्षीकाम केलेल्या ब्लाउजची किंमत 35 हजार रुपये आहे.
श्रद्धा कपूर हिने पायात घातलेल्या नक्षीकाम केलेल्या डिझायनर सँडलची किंमत तब्बल 85 हजार रुपये इतकी आहे. अशा प्रकारे अभिनेत्रीने स्वतःलूक पूर्ण केला आहे. सध्या सर्वत्र फक्त श्रद्धा कपूर हिच्या मराठमोळ्या लूकची चर्चा रंगली आहे.