Rohit Pawar: ‘सुनेत्रा वहिनींना दादांसारखे काम येत नाही’, रोहित पवार यांचं मोठे विधान
दादा गेल्यानंतर दादांची जागा कोणी घेऊ शकत नाही. सुनेत्रा पवारांना पुणेकेरांची अपेक्षा पूर्ण करता येते असं आम्हालाही वाटत नाही, असे म्हणत मुख्यमंत्री यांनी पुण्याचे पालकमंत्री पद घेतले तर पुण्याचे वाटोळे होईल. पुण्याला जरा कडक पालकमंत्री द्या किंवा सुनेत्रा काकींना ताकद द्या," असं ते म्हणालेत.

Rohit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. आज सकाळी शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल झाले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. तसेच माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी पुण्यातील गुन्हेगारीवरुन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नाव घेत मोठे विधान केले.
काय म्हणाले रोहित पवार?
“पालकमंत्री म्हणून कायदा व सुव्यवस्थेबाबत सुनेत्रा वहिनींची जबाबदारी आहे, पण राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री फडणवीसांचीही जबाबदारी आहे. पुण्याचे पालकमंत्री दादांसारखे काम करत नाहीत, हे सुप्रिया सुळे बोलल्या ते खरे आहे, दादांसारखं काम कोणाला जमणार नाही, दादांचा वचक होता, प्रशासनावर दबाव होता, त्यांचा दरारा होता. दादा गेल्यानंतर दादांची जागा कोणी घेऊ शकत नाही. सुनेत्रा पवारांना पुणेकेरांची अपेक्षा पूर्ण करता येते असं आम्हालाही वाटत नाही, असे म्हणत पुण्याला जरा कडक पालकमंत्री द्या किंवा सुनेत्रा काकींना ताकद द्या,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत दिली माहिती!
“महाराष्ट्राच्या दुष्काळाच्या परिस्थितीबाबाबत राष्ट्रवादीचे नेते, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे यांची चर्चा सुरु होती. बैठक सुरु असतानाच सुप्रिया सुळे यांना समजलं की शरद पवार यांची तब्येत थोडी नरम वाटत आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सुप्रिया सुळे तिथे गेल्या, त्या डॉक्टरांना भेटल्या, त्यांनी आत्ता साहेबांची तब्येत ठीक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. आता त्यांना दोन दिवस इतर काही चेकअप करुन घेण्यासाठी त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येईल,” अशी माहिती रोहित पवार यांनी दिली आहे.
राज्यातील नेत्यांना मोठे आवाहन!
दरम्यान, प्रफुल पटेल आणि शरद पवारांच्या भेटीवरुनही रोहित पवार यांनी महत्त्वाचे विधान केले. “एखादा नेता आजारी असेल तर कोणीही त्यांना जाऊन भेटू शकतो. मात्र एखादी व्यक्ती आजारी असतो, त्यांच्यावर उपचार सुरु असतो तेव्हा तिथे इन्फेक्शनची भिती असते. त्यामुळे इन्फेक्शन होईल असं कोणत्याही नेत्याने करु नये, असं मला वाटते, असं महत्त्वाचे विधान रोहित पवार यांनी केले. तसेच शरद पवार नेहमी भेटायला तयार असतात, त्यांना वेळेचे भान राहत नाही, त्यामुळे जेवण वेळेवर होत नाही त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होतो,” असंही रोहित पवार म्हणाले.
