दोन भाऊ आणि एक पत्नी, या समुदायात का आहे अशी विचित्र प्रथा?
Traditional Polygamous Marriage: जगात बहुपत्नीची प्रथा आपण ऐकली असेल. पण हिमाचल प्रदेशातील या समुदायात दोन जोडीदाराची आगळीवेगळी प्रथा आहे. पण अशी परंपरा का पडली? काय आहे त्यामागील कारण?

Traditional Polygamous Marriage: हिमाचल प्रदेशात एका लग्नाची चर्चा आजही देशात होते. इथे बहुपती विवाह झाल्याने सगळेच चक्रावले होते. सिरमौर जिल्ह्यात्या शिलाई परिसरातील प्रदीप नेगी आणि कपिल नेगी या दोन भावांनी जुलै 2025 मध्ये सुनीता चौहान यांच्याशी विवाह केला होता. एकाच महिलेशी दोन सख्ख्या भावांनी लग्न केल्याने त्याची चर्चा झाली. हाटी समुदायात प्रचलित असलेल्या जोडीदाराच्या संकल्पेनुसार बहुपती प्रथेशी निगडीत मानली जाते.
बहुपती प्रथेविषयी सुनीता चौहान यांची भूमिका
या नात्यामधील पत्नी सुनीता चौहान यांनी या बहुपती प्रथेविषयी त्यांची भूमिका मांडली. असे लग्न करण्यासाठी कुणाचाही दबाव नसल्याचे त्या म्हणाल्या. प्रदीप आणि कपिल या दोघांसोबत संसार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. तर प्रदीप नेगी आणि कपिल नेगी या दोन्ही भावांनीही या नात्याविषयी संमतीने निर्णय घेतल्याची माहिती दिली. कुटुंब हा एकत्रित जबाबदारीचा भाग असल्याचे त्यांच म्हणणे. एकत्र कुटुंब असल्याने उत्पन्न आणि आर्थिक भार कमी होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
बहुपती प्रथेमागील कारण काय?
तर हाटीच नाही तर डोंगराळ आणि दुर्गम भागातील काही समुदायांमध्ये भातृ बहुपती प्रथा आहे. ती अनेक शतकांपासून सुरू आहे. त्यामागे तिथले सामाजिक, आर्थिक गणितं आहेत. अनेकांना ही बाब न पटणारी असली तरी तिथल्या परिस्थितीत ही बाब सामान्य आहे. ही प्रथा सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती जुळलेली आहे. डोंगराळ भागात शेतीयोग्य जमीन आणि संसाधने मर्यादित आहेत. कुटुंबातील जमीन आणि मालमत्तेचे तुकडे होऊ नयेत आणि कुटुंब एकत्र राहावे यासाठी अशी प्रथा आजही प्रचलित आहे. अर्थात मुलीवर यासाठी कोणताही दबाव नसतो. मुलीने नकार दिल्यास तिच्यावर लग्न लादल्या जात नाही.
आता आधुनिक काळात ही प्रथा फार कमी झाली आहे. कारण कुटुंबातील काही जण नोकरीच्या निमित्ताने इतर शहरात स्थलांतरित झाले आहेत. तर जमीन कसणारे कमी झाले आहेत. हाटी समाज या भागातील प्रमुख समुदाय आहे. सिरमौरच्या दुर्गम आणि डोंगराळ भागात हा समुदाय राहतो. हाट म्हणजे बाजार हाट या शब्दावरून या समुदायाला हे नाव पडले. या भागातील लोक आठवडी बाजारात शेतीमाल आणि इतर वस्तुंची खरेदी-विक्री करण्यासाठी एकत्र येत, त्यावरून त्यांना हे नाव पडले.
